शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी प्रतिनिधी – पिंपरी येथील हिंदूस्थान अॅन्टिबायोटिक्स कंपनीस १०० कोटी रुपयांची आर्थिक मदत करून केंद्र व राज्य सरकारची चर्चा करून शहारवासियांना मोफत लस व रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देणेबाबतचे निवेदन भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.
याबाबत निवेदनात वाघेरे असे म्हणारे की,पिंपरी-चिंचवड महानरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील हिंदूस्थान अॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनीला देशाच्या औषध निर्मितीच्या सुरुवातीच्या काळातील योगदानाबद्दल मोठा इतिहास आहे. एचए कंपनीतील पेनीसिलीन औषधाची निर्मिती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांना पुणे येथे आगाखान पॅलेसमध्ये असताना पेनीसिलीन वेळेत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी तत्काळ पेनीसेलिन निर्मितीचा कारखाना पिंपरी येथे सुरु करण्याचे आदेश दिले व एचए कंपनी उभी राहिली.
याच धर्तीवर देशाला कोरोना महामारीच्या काळात लस व औेषधांची गरज असताना एचएला पुन्हा देशसेवेसाठी उभे करता येईल. त्यासाठी एचए कंपनीला लस निर्मिती करण्याची परवानगी केंद्र शासनाकडून घ्यावी वेळप्रसंगी हाफकिन इन्स्टिट्यूट बरोबर भागिदारी (टायप) करावी. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेने एचए कंपनीकडून लस घेण्यासाठी एचए कंपनीला सुमारे १०० कोटी रुपये आर्थिक सहकार्य करावे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोफत लस व रेमडेसिविर अथवा कोरोना महामारीला लागणारे औषधेही मिळतील. तसेच एचए कंपनीच्या ४५० कामगारांना आणि कंपनीलाही कंपनीच्या अडचणीच्या व वाईट काळात मदतीचा हात मिळेल. एचए कंपनीच्या निवृत्त झालेल्या येणेबाकी असलेल्या १२५ कामगारांनाही अर्थिक मदतीचा हात मिळेल.
पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका यांनी कंपनीला स्वहिस्सा व केंद्र व राज्य सरकारच्या वतीने आर्थिक मदत एचएला करावी. ही मदत झाल्यास एचए कंपनीत रेमडेसिविर सारखी कोरोनावरील औषधे तयार होतील. तसेच एचए कंपनीत सध्या पावडर स्वरुपात औषध बनविणार्या मशनरींबरोबरच लिक्विड स्वरुपात लस, औषधे बनविणार्या अद्ययावात मशिन्स युध्दपातळीवर लावून लस बनविण्याची केंद शासनाकडून परवानगी घेतल्यास एचए कंपनीचे खर्या अर्थाने पुर्नजिवन होईल. याबरोबरच पिंपरी-चिंचवड व पुणे शहराबरोबरच राज्य व देशात लस व कोरोनाचा औषध पुरवठा मोफत करता येईल. तसेच आयुक्त श्री.राजेश पाटील यांनी एचए कंपनीच्या सरव्यवस्थापकांशी बोलून राज्य व केंद्र सरकारशी चर्चा करावी आणि जलदगतीने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. अशी आग्रही मागणी वाघेरे यांनी केली आहे.
सदर निवेदनाच्या प्रति मा. श्री. नरेंद्र मोदि, पंतप्रधान, भारत सरकार, दिल्ली., मा. श्री. नितिन गडकरी, रस्ते,परिवहन व राजमार्ग मंत्री, भारत सरकार., मा. श्री. हर्षवर्धन, केंद्रिय आरोग्य मंत्री, भारत सरकार, दिल्ली., मा. श्री. शरद पवार, राज्यसभा खासदार, दिल्ली. ,मा. श्री. उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. , मा. श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,मुंबई.,मा. श्री.राजेश टोपे, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई.,मा. सौ.उषा उर्फ माई ढोरे , महापौर,पिंपरी-चिंचवडमहानगरपालिका.,मा.श्री.श्रीरंगबारणे,खासदार,मावळ लोकसभा.,मा.श्री.गिरीष बापट,खासदार,पुणे लोकसभा.,मा.श्री.अमोल कोल्हे,खासदार,शिरूर लोकसभा. यांना देखिल देण्यात आलेल्या असून याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची आशा वाघेरे यांनी व्यक्त केली आहे.