शबनम न्यूज / पुणे
पुणे : बिबवेवाडीत मध्यरात्री सराईत गुन्हेगाराचा टोळक्याने वार करुण खून केल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. मात्र, शहरात दिवसभर कडक लॉकडाऊनची कारवाई सुरू असताना मध्यरात्री टोळक्याचा धुडगूस सुरूच असल्याचे दिसत आहे.
माधव हनुमंत वाघाटे (वय 28, रा. सहकारनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात 10 जणांच्या टोळक्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधव हा सहकारनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. दरम्यान, मध्यरात्री माधव याचा मित्र सुनील खाटपे याने फोनकरून माझे भांडण झाले आहे.
मी बिबवेवाडी येथील ओटा स्कीमजवळ असल्याची माहिती दिली. त्यामुळे माधव आणि यातील फिर्यादी सिद्धार्थ पालांगे हे दोघे दीड वाजण्याच्या सुमारास येथे आले. ते येथील चौकात सुनील याची वाट पाहत असताना अचानक दहा जणांचे टोळके हातात लोखंडी रॉड, बांबू व ट्यूब लाईट सारखे हत्यारे घेऊन आले. त्यांनी माधव याला शिवीगाळ करत त्याच्या तोंडावर आणि डोक्यात बेदम मारहाण करून त्याचा खून केला. त्यानंतर हे टोळके पसार झाले आहे.
दरम्यान, नेमका हा खून का झाला हे समजू शकलेले नाही. मात्र, फक्त मित्राच्या सांगण्यावरून तो गेल्यानंतर हा प्रकार घडला आहे. तो मित्र देखील पसार आहे. बिबवेवाडी पोलीस पुढील तपास करत आहे.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे