शबनम न्यूज / पुणे
पुणे : नऱ्हेगावात अज्ञात टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये 32 वर्षीय सुमित नाना वैराट हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अंगावर वार होत असताना जवळच्या इमारतीत असणाऱ्या रहिवाशाने सुमितला घरात घेतल्यामुळे तो बचावला. पूर्ववैमस्यातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सुमित नाना वैराटला तात्काळ उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झील कॉलेज चौकात घडली. घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना मिळाले आहेत.
नऱ्हेगावातील झील कॉलेज चौकातील रस्त्यावर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा अज्ञात तरुणांनी एकत्र जमून सुमित वैराट या तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. अंगावर वार होत असताना जवळच्या इमारतीत असणाऱ्या एका व्यक्तीने जखमी अवस्थेत सुमितला घरात घेऊन दरवाजा लावल्याने त्याचा जीव वाचला.
सुमितला उपचारासाठी जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पूर्ववैमस्यातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना मिळाले असून दोन आरोपींना सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनेचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव, कुलदीप संकपाळ या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. इतर आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली असून सिंहगड रस्ता पोलीस अधिक तपास करत आहेत.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे