एस के आर्ट प्रोडक्शनचे संस्थापक शिवा बागुल, आयोजित पहिले ऑनलाइन कलावंत जनआंदोलन दिनांक 16 मे 2021 रोजी दुपारी २:३० वाजता ऑनलाईन माध्यमातून करण्यात आले. यात महाराष्ट्रातील कलाकारांच्या 35 संघटना, निर्माते, दिग्दर्शक, पत्रकार, जेष्ठ अभिनेते विजय पाटकर, मिलिंद दास्ताने व भोसरी विधान सभेचे आमदार महेश दादा लांडगे उपस्थित होते. हे आंदोलन google meet वरून यु ट्यूब व काही डिजिटल पोर्टल वर live केले होते.
या आंदोलनाची प्रस्तावना आयोजक श्री शिवा बागुल सर, लेखक/दिग्दर्शक व एस के प्रोडक्शनचे संस्थापक यांनी केली. पहिल्या जनआंदोलनाचे प्रमुख म्हणून यांनी या आंदोलना मागचा उद्देश सर्वप्रथम मान्यवरांना व्यक्त केला. यात कलाकारांच्या अनेक समस्या आहेत. या समस्याना सर्वासमोर मांडल्या.
शिवा बागुल सरांनी त्यांचे विचार मांडताना सांगितले की कलाकार फक्त स्वतःसाठी जगत नसून तो इतरांसाठी एक जगण्याचा माध्यम आहे लोक डाऊनच्या काळात घरात आहेत, त्यावेळी कित्येक कलावंत रस्त्यावर उतरून इतरांना मदत करत आहेत.
शासनाने बऱ्याच लोकांना मदत केली आहे असं सांगत आहे परंतु त्याची कुठलीही नोंद किंवा किती लोकांना मदत पोहोचवली याबद्दल कुठेही काही लिहिलेलं नाहीये. यासाठी सर्व कलाकारांनी एकत्र येऊन शासनाकडे या गोष्टीची मागणी करायला हवी.
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते विजय पाटकर सर यांनी अतिशय परखड भूमिका मांडली. मला या चित्रपट सृष्टी मध्ये 35 वर्ष झालेली आहे. त्या वेळे पासून तर आत्ता पर्यंत शासनाने आजपर्यंत कधीच भरीव मदत केलेली नाही. त्यामुळे आपण आधी संघटित होऊन, आवाज उठवला पाहिजे. आपला डेटा एकत्र करून सर्व संघटना मिळून आठ ते दहा लाख लोक एकत्र आले आणि जर एक डेटा तयार झाला तर शासनाला कळून येईल की कलाकार किती आहेत. म्हणून संघटित होणे महत्त्वाच आहे. माथाडी कामगारांनी त्यांच्या संघटने मधून एक हॉस्पिटल निर्माण केलेला आहे, पण कलाकारांकडून या गोष्टी शक्य झालेल्या नाही. तर आता महाराष्ट्रातल्या ह्या एकूण प्रमुख 35 संघटनानी पुढे येऊन सरकारच्या मदतीने हे कार्य केले पाहिजे. मी स्वतः यांसाठीही खूप प्रयत्न केले. निदान दोन लाखाचा विमा तरी आमच्या कलाकारांना मिळाला पाहिजे. यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कलाकार कुटुंब कल्याण मंडळ यांच्या माध्यमातून होईल तेवढी मदत करण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहे.
असोसिएशन ऑफ फिल्म अंड व्हिडीओ इडिटर्स संघटनेचे अध्यक्ष, यशराज सुर्वे यांनी सर्वात महत्त्वाचा मुद्दा मांडला की, शासनाला सर्वात जास्त टॅक्स हा सिने कलावंत व चित्रपट सृष्टीतील कलावंतांपासूनच मिळतो. केरळ राज्यातील विचार केला तर चित्रपट सृष्टीतील कलाकार व इतर कलाकारांच्या पाठीमागे शासन खंबीर पणे उभे आहे. कलाकारांचा फक्त मनोरंजनासाठीच उपयोग, म्हणून न बघता, एक माणूस म्हणून त्याचा विचार शासनाने करने गरजेच आहे. प्रोडूसरचे आणि डायरेक्टरचे खूप अतोनात हाल होत आहेत.
ज्येष्ठ अभिनेते मिलिंद दस्ताने सर सध्याच्या परिस्थिती वर भाष्य केले. आपल्या राज्यामध्ये शूटिंगला परवानगी नसल्यामुळे, या समस्या निर्माण झालेल्या आहेत. कारण चित्रपट व मालिका यांचे शुटींग चालू झाले तर, आपोआप कलावंतांना रोजगार मिळण्यास सुरुवात होईल. बाकीच्या राज्यांमध्ये शूटिंग वरती बंदी नसल्यामुळे, तिथल्या कलाकारांना अजिबात या समस्यांना सामोरे जाण्याची गरज पडत नाही. आपल्या राज्यातील कलावंत शूटिंग करण्यासाठी परराज्यात जात आहे, ही एक खूप मोठी शोकांतिका आहे. चित्रपट महामंडळची निवडणूक होते किंवा कुठल्याही चित्रपट संस्थेचे निवडणूक होते, तर त्यावेळी ती संस्था गल्लीबोळात जाऊन कलाकारांना शोधते व मतदानासाठी प्रोत्साहित करते, मग आज अशी परिस्थिती कलाकार व टेक्निशियन व इतर कलाकारांवर आलेली असताना, या संघटनांनी त्यांना मदत करायला हवी. सर्वांचे खाण्यापिण्याचे अतोनात हाल होत आहे. किरायाचे घर असल्यामुळे घर भाडे देण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. राजकीय मतभेद दूर ठेवून सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊन कलाकार आणि त्याला जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करायला हवे. शासनाने शूटिंग वरचे निर्बंध हटवायला हवे, कारण कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होईल.
संवाद या पुण्यातील संघटनेचे सुनील महाजन सर नी शोकांतिका मांडली की, शासनापर्यंत आपला आवाज पोहोचण्यासाठी चित्रपट संघटना जेवढी मजबूत असायला पाहिजे, तेवढी मजबूत नाहीये.
चित्रपट महामंडळ असो किंवा नाट्यपरिषद असो सर्वांनी खरे कलाकार कोण आहेत, हे सर्वप्रथम ओळखून नोंदणी करुन शासनदरबारी आपले गाऱ्हाणे मांडले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
दिग्दर्शक विजय राणे सर यांनी महामंडळची माहिती देतांना सांगितले की, चित्रपट महामंडळ म्हणजे एक एनजीओ आहे, त्यात शासनाचे काहीही संबंध नाही. सर्व संघटनांनी एकत्र येऊन त्यांच्या संघटनेच्या अंतर्गत असलेल्या कलाकारांची यादी करून ती प्रसिद्ध करावी. रोजंदारीवर चित्रपटांमध्ये काम करणारे काही लाखाच्या आसपास कलाकार आहेत. तसेच रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही, तर शासन दरबारी सुध्दा आपल्याला रडायलाच लागेल.
भोसरी विधान सभेचे आमदार महेश दादा लांडगे हे ही या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी आपले मत व्यक्त करतांना, शासनातर्फे अनेक घटकातील लोकांना मदत मिळत असताना, कलाकारांना सुद्धा मदत केलीच पाहिजे. तशी मागणी कोणी करत नसेल तर, मी स्वतः कलाकारांच्या समस्यांची मागणी करेन. जोपर्यंत कलाकारांच्या समस्या सोडवल्या जाणार नाहीत, तोपर्यंत शासनदरबारी लढा करण्यास सर्व चित्रपटाशी संबंधित संघटनांच्या खांद्याला खांदा लावून शासन दरबारी मागणी लावून धरु. काही ठराविक चित्रपटातील लोकांची बैठक घेऊन, या सर्व समस्या लिहून माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देऊ, असे त्यांनी जाहीर केले.
सातारा येथील पत्रकार व फिल्म कॅमेरामन दिलीप कुमार डोंगरे यांनी चित्रपट महामंडळ स्वतःला अपडेट होण्याची गरज असल्याचे सांगितले. परंपरागत त्याच त्याच गोष्टी जो पर्यंत बदलत नाहीट, तोपर्यंत अशा समस्यांना सामोरं जावे लागेल. शासनाने लवकरात लवकर शूटिंग चालू करण्यासाठी परमिशन द्यावी, कारण याच्यातून खूप मोठ्या लोकांच्या समस्या सुटतील व शासनाला मिळणारा मोबदला ही चालू होईल. जेणेकरून शासनाचे ही उत्पन्न सुरू राहील.
मुंबई फिल्म फेडरेशनचे सेक्रेटरी अशोक दुबे सर यांनी जाहीर केले की, फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून 50 हजार आर्टिस्ट आणि वर्करला फिल्मी कलाकारांनी मिळून जमा केलेल्या रकमेतून जवळपास दोन कोटी रुपये मदत ही चित्रपट कलावंत व पडद्यामागच्या कलाकारांना करण्यात आली.
काही संघटनानी मागणी केली की, मजूर, टेक्निशियन, आर्टिस्ट यांना med claim आणि इन्शुरन्स करुन घेतले पाहिजे. या विषयी मुख्यमंत्री साहेबाना 5 पत्र पाठवले. तसेच आर्थिक पॅकेज साठी सुद्धा निवेदने दिली मात्र तिकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही.
देवाग्रूप चित्रपट संघटनेचे अध्यक्ष रोहितजी गायकवाड यांनी कलाकारांना मदत करण्यासाठी सरकार सोबतच संघटनांनी सुद्धा पुढे आले पाहिजे, असे विचार मांडले. कलाकार कोणताही असो लॉकडाऊन मुळे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. संघटनेच्या माध्यमातून सरकारला खूप निवेदने देण्यात आली व कलाकारांना मोफत लस देण्याची मागणी करण्यात आली. देवा ग्रुप चित्रपट संघटनेच्या माध्यमातून पुढाकार घेऊन आर्थिक पॅकेज ची वाट न पहाता संघटनेच्या माध्यमातून कलाकारांना व चित्रपटसृष्टीतील कलावंताना मदत करण्यात आली. असे त्यांनी जाहीर केले.
गोंदिया जिल्ह्याचे चित्रपट दिग्दर्शक दिलिप कोसरे सर यांनी आपले मत मांडताना चित्रपटासाठी कोणत्याही प्रकारचे अनुदान आत्ता पर्यंत शासनाने दिले नाही आणि नाटकांच्या कलाकारांची सुद्धा बिकट परिस्थिती सुरु आहे. तर त्यांना आर्थिक मदत शासनाने करायला हवी, अशी मागणी या आंदोलनात केली.
प्रहार चित्रपट संघटनेचे प्रमुख मंगेश सिरसाठ यांनी लक्ष वेधले ते अखील भारतीय मराठी चित्रपट महामंडळ च्या कार्या बाबत. महामंडळ मध्ये सदस्य फी म्हणून कलाकारांकडून पैसे घेतलेले आहे तर, महामंडळाने कलाकारांना आर्थिक मदत करावी. कारण सामान्य कलाकारच जगला तरच कला व महामंडळ जिवंत राहील. तसेच तमाशा कलाकार चित्रपट कलाकार पारंपरिक कलाकार इत्यादी असंख्य कलाकार आज या करुणा महामारी मध्ये अत्यंत बिकट परिस्थिती मध्ये जगत आहे. याचीही मागणी काही संघटनानी केली.
फिल्म फेडरेशन, मुंबईचे सेक्रेटरी दुबे सर यांनी यशराज फाउंडेशन व नेट फ्लिक्स, तसेच सलमान खान फाउंडेशन इत्यादींच्या माध्यमातून 35000 कलाकारांना त्यांच्या अकाउंट वरती पैसा पाठवन्यास आल्याची माहिती दिली. बिग बाजार चे 35000 कुपन 1500 रुपये प्रमाणे कलाकारांना वाटण्यात आल्याचे सांगितले.
मनसे चित्रपट संघटनाचे दत्ताजी घुले यांनी उद्योग व अन्य क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांना शासनाने आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे, पण कलाकारांना कुठल्याच प्रकारचे अनुदान किंवा पॅकेज सरकारने दिलेले नाही. कलाकाराला दुय्यम स्थान शासनाने दिले आहे. यासाठी मनसे चित्रपट सेना स्वता कलाकारांना मदत करत आहे.
अभिनेते संदीप साखरे सर यांनीही आपले मत मांडले. कलाकारांना मागच्या दोन ते तीन वर्षापासून संकटांचा सामना करावा लागत आहे. सध्या शूटिंग वर ही बंदी आणली गेली आहे. कलाकारांच्या संदर्भात कुठलीच भूमिका स्पष्ट होताना दिसत नाहीये. शासन मदत करताना दिसत नाही. एखादा कलाकार जर मृत्यू झाला तर, त्याचं घर कसं चालेल? वादक असेल, अभिनेता असेल, गायक असेल, जर तो गेला तर त्याच्या परिवाराला आसरा तुम्ही द्यायचा हा एक महत्वपूर्ण प्रश्न त्यांनी मांडला.
निर्माते बाळासाहेब बांगर यांनी अपेक्षा व्यक्त केली की, आजच्या मिटिंग मधून खरंच विविध पक्ष बाजूला ठेवून सर्व कलाकार प्रतिनिधींनी एकत्र आले, तसेच एकत्रित आपली ठाम बाजु शासनालापुढे मांडली पाहिजे. सर्व कलाकार व निर्माते तंत्रज्ञ सर्व लोक एकत्र येऊन आपले संघटन किती मोठं आहे हे दाखवण्याची वेळ आलेली आहे.
निर्माते बाळासाहेब गोरे सर यांनी आपले विचार मांडताना, दोन ते तीन वर्षापासून चित्रपटांना मिळणारी सबसिडी बंद करण्यात आलेली आहे, ती मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे जाहीर केले.
झाडीपट्टी नाट्य अकडमीचे अध्यक्ष, अनिरुद्ध वनकर, यांनी ग्रामीण भागातील कलाकारांच्या व्यथा मांडल्या. आम्ही खूप बिकट परिस्थितीत जगत आहोत. मुंबई पुण्यातल्या कलाकार पेक्षा आमचेही खूप हाल होत आहेत.
मराठी टॅलेंट चित्रपट संघटनाचे अध्यक्ष योगिराज लिपणे यांनी, महामंडळ मध्ये नोंदणी करण्यासाठी प्रत्येक कार्डला कुठल्या ना कुठल्या प्रकारची फी असते, तर आता त्या फी मधून काही मदत केली पाहिजे, अशी मागणी केली.
आर्टिस्ट वेल्फेअर असोसिअशनचे अध्यक्ष सचिन देठे यांनी विचार मांडतांना चित्रपट कलावंत व इतर आर्टिस्ट सोबत ऑर्केस्ट्रा कलाकारांना ही मदतीची गरज असल्याचे सांगितले.
छावा चित्रपट संघटनेचे पुणे अध्यक्ष आकाश घोगरे यांनी कलाकारांची व्यथा मांडतांना कलाकारला मनोरंजनासाठी प्राथमिकता दिली जाते, पण जेव्हा त्याला समस्यांचा सामना करावा लागतो, तेव्हा त्याची साथ कोणीच द्यायला तयार नसते. तर त्यांचा विचार इतर समाजाने व शासनाने केला पाहीजे.
चित्रपट आणि नाट्य संस्थेचे चेतन गिरी यांनी कलाकारांसाठी सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन बँक तयार करावीण्याची गरज मांडली.
दिग्दर्शक चंद्रशेखर सांडवे यांनी भविष्याचे विदारक चित्र मांडतांना, जर कलाकार जिवंत राहिला व तंत्रज्ञ जिवंत राहिला, तरच चित्रपट महामंडळ सुद्धा जिवंत राहू शकेल. कलाकार असो किंवा निर्माता असो आता त्याच्याकडे पैसा नाही तर तो मदत कुठून मागणार. कलाकारांना पुरस्कार देण्या ऐवजी आता जगण्यासाठी मदत करावी, हीच महामंडळाला विनंती. असे स्पष्ट मत मांडले. कलाकार आजारी असेल तर, त्याला मदत करा. त्याला औषध गोळ्याचा खर्च द्या. अशी अपेक्षा महामंडळाकडून त्यांनी व्यक्त केली. शासनाला नियमीत इन्कम टॅक्स भरून आम्ही कलाकार चित्रपट सृष्टी मध्ये काम करत आहोत तर शासनाने आमच्या कडे लक्ष दिले पाहिजे.
ऑल डान्सर असोसिअशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष निल कांबळे यांनी इच्छा व्यक्त केली की,
कलाकारांनी कला व्यतिरिक्त साइड बिझनेस करावेत. शासनाने त्यांना छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी मदत करावी. एक हजार ते दीड हजार रुपयांमध्ये कलाकारांचं घर चालू शकत नाही कशामुळे शासनाच्या निधीवरच अवलंबून न राहता स्वावलंबी बनावं.
या आंदोलनाचा समारोप करतांना आयोजक शिवा बागुल यांनी सर्वांचे आभार मानले व लवकरच एक मुख्य समिती निर्माण करण्या विषय सांगितले. ही समिती शासन दरबारी आपल्या समस्या मांडेल. तसेच शेवटी अभिनेते विजय पाटकर यांनी आपण सर्व संघटना मिळून पुन्हा एकत्र येण्याचा निश्चय केला व भविष्यात एकत्रित कलाकारांसाठी काम करण्याचे जाहीर केले.
या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी आयोजक शिवा बागुल सोबत प्रज्ञा पाटील व श्रीमंत पाटील यांनी मदत केली.