पुणे, दि. 17 : पुणे विभागातील 12 लाख 51 हजार 888 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 लाख 26 हजार 596 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 47 हजार 375 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 27 हजार 333 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.92 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 87.75 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 69 हजार 480 रुग्णांपैकी 8 लाख 76 हजार 480 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 77 हजार 759 आहे. कोरोनाबाधित एकूण 15 हजार 241 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.57 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 90.41 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 36 हजार 668 रुग्णांपैकी 1 लाख 10 हजार 829 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 243 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 596 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 32 हजार 11 रुग्णांपैकी 1 लाख 11 हजार 371 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार 120 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 520 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 383 रुग्णांपैकी 81 हजार 235 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 226 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 922 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 88 हजार 54 रुग्णांपैकी 71 हजार 973 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 27 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 12 हजार 402 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 5 हजार 361, सातारा जिल्ह्यात 1 हजार 711, सोलापूर जिल्ह्यात 3 हजार 86, सांगली जिल्ह्यात 1 हजार 77 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 167 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 18 हजार 904 आहे. पुणे जिल्हयामध्ये 10 हजार 91, सातारा जिल्हयामध्ये 2 हजार 160, सोलापूर जिल्हयामध्ये 3 हजार 299, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 793 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 561 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरण प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 25 लाख 14 हजार 312, सातारा जिल्ह्यामध्ये 6 लाख 84 हजार 143, सोलापूर जिल्हयामध्ये 4 लाख 77 हजार 202, सांगली जिल्हयामध्ये 6 लाख 48 हजार 69 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 11 लाख 18 हजार 83 नागरिकांचा समावेश आहे.