शबनम न्युज / वाकड
वाकड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 6.420 टन रक्तचंदन भरलेला ट्रक, एक कार आणि मोबाईल फोन असा एकूण सहा कोटी 52 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
निलेश विलास ढेरंगे (वय 35, रा. मु पो पिपंळगाव देपा संगमनेर अहमदनगर), एम. ए. सलिम (वय 43, रा. नंबर 62 जोग रोड कारगल कॉलनी, ता. सागर, जि. शिमोगा, कर्नाटक), विनोद प्रकाश फर्नांडिस (वय 45, रा. नाईक चाळ, एमजीम हॉस्पीटल शेजारी कातकरवाडी नौपाडा कळंबोली, नवी मुंबई), झाकीर हुसेन अब्दुलरेहमान शेख (वय 50, रा. एफ/जी/1 चिता गेट ट्रॉम्बे मुंबई), मिन्टोभाई उर्फ निर्मलसिंग मंजितसिंग गिल (वय 36, रा. मॅकडोनल्डजवळ कळंबोली, नवी मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस नाईक वंदु गिरे आणि पोलीस हवालदार राजेंद्र काळे 12 मे रोजी पेट्रोलिंग करत होते. व्हीजन मॉल ताथवडे येथे त्यांना एक पांढ-या रंगाची मारुती 800 कार दिसली. त्या कारला पुढे नंबर प्लेट नव्हती व मागील नंबर प्लेट ही अर्धवट तुटलेली होती. काहीजण कार जवळ थांबले असल्याने कारचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यातील तिघांना पकडले आणि त्यांच्याकडे विचारणा केली. दरम्यान पकडलेल्या तिघांच्या मागे थांबलेले दोघेजण अंधारात पळून गेले. त्यामुळे पोलिसांनी तिघांकडे चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर निलेश ढेरंगे याच्या मोबाईल फोनची पाहणी केली असता त्यात रक्त चंदनाने भरलेल्या ट्रकचे फोटो शेअर केल्याचे दिसले.
आरोपींनी रक्तचंदन चोरुन रक्तचंदनाने भरलेला ट्रक (एम एच 40 / ए के 1869) निलकमल हॉटेल समोरील मोकळ्या जागेत ताथवडे येथे लावल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ट्रक जवळ जाऊन पाहणी केली. ट्रकमध्ये पिवळसर रंगाचे स्पंज (फोम) शीट्सच्या पाठीमागे सुमारे पाच ते सहा फुटाचे गोलाकार रक्त चंदनाचे 6.420 टन वजनाचे लाकडी ओंडके आढळले.
सुरुवातीला पोलोसांनी निलेश, सलीम, विनोद या तिघांना अटक केली. त्यानंतर अन्य दोघांना नवी मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 6.420 टन वजनाचे 207 नग रक्तचंदन लाकडाचे ओंडके, एक ट्रक, एक कार, दोन मोबाईल फोन असा एकूण सहा कोटी, 52 लाख, 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींनी बनावट कागदपत्रे व ट्रकच्या बनावट नंबर प्लेटच्या आधारे रक्तचंदन चोरुन आणल्याचे निष्पन्न झाले आहे. हा माल कुठून आणला व कुठे विक्री करणार होते. तसेच रक्तचंदन तस्करीचे काही अंतराष्ट्रीय कनेक्शन आहे का याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्तरामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डीसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरिक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस अंमलदार वंदू गिरे, राजेंद्र काळे, सुरज सुतार, कौंतेय खराडे, कल्पेश पाटील, अतिश जाधव, प्रशांत गिलबिले, बिभीषन कन्हेरकर, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, बापुसाहेब घुमाळ, तात्या शिंदे, नितीन ढोरजे, प्रमोद कदम, जावेद पठाण, बाबाजान इनामदार, सचिन नरुटे, शाम बाबा, नुतन कोंडे यांनी केली आहे