शबनम न्युज / धाराशिव
भुम – परांडा भागातील मौजे सोनारी हे गाव तेथील काळभैरवनाथ मंदीर परीसरातील माकडांसाठी प्रसिद्ध आहे. कोरोनामुळे गतवर्षीपासून येथील माकडांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकजण आपापल्या परीने खाद्य पुरवत आहेत. परंतु… उद्योगपती अरुण पवार यांची भुतदया अनोखी आहे. याचे प्रत्यंतर सोनारी येथील ग्रामस्थांना आले आहे.
सोनारी गाव म्हटले, की… येथील माकडांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. होय, तब्बल दिड हजारांहून अधिक माकडे येथे वास्तव्यास आहेत. अनेकवेळा दुष्काळाच्या झळा या जीवांना भोगाव्या लागतात. या जीवांना खाद्य आणि पाण्यासाठी भटकंती करावी लागते. परंतु… यांची गुजराण चालते, ती कुलदैवत काळभैरवनाथ यांच्या भक्तांमुळे! अगदी कर्नाटक राज्यातीलही हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. पण्… आपणास माहीत आहे, की गतवर्षापासून कोरोनामुळे येथील भाविकांची ये – जा थांबली आहे. अण्… या मुक्या प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या प्राण्यांच्या उदरनिर्वाहासाठी येथील “भैरवनाथ जोगेश्वरी अन्नछत्र मंडळ ट्रस्ट”चे अध्यक्ष महेश कारकर तसेच अविनाश हांगे, प्रकाश जगताप, अशोक माने, रविंद्र खुळे, भिमा घाडगे, सागर वायकर, सज्जन गोसावी, योगेश बनसोडे, ब्रम्हदेव वाडेकर हे सर्व पदाधिकारी कार्यरत आहेत.
हे ऐकून पुणेस्थीत ‘मराठवाडा जनविकास संघा’च्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे जनसेवेचे व्रत हाती घेतलेले उद्योगपती जनसेवक अरुण पवार यांना अस्वस्थ वाटले आणि त्यांच्यातील भुतदया जागी झाली. मग… शांत बसतील ते अरुणभाऊ कसले? त्यांनी शेंगदाणे, फुटाणे, काकडी, टोमॅटो, चिक्कु, कलिंगड, पेरु आणि खरबूज असे पाच – सहाशे माकडांना पंधरा – विस दिवस सहज पुरेल इतके खाद्य सोनारीत पोहोच केले. माकडांना खाद्य दिल्यानंतर बोलताना अरुण पवार म्हणाले, की… आपण सर्वांनी कोरोना विषयक नियम पाळुन शासकीय यंत्रणेस सहकार्य करावे. शेवटी आपल्या लोकांची काळजी घेत, कोरोनास रोखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. याप्रसंगी अरुणभाऊ पवार यांचेसोबत अभिषेक पवार यांचेसह डोंजे गावचे मा. सरपंच गजेंद्र भोरे, सागर भोरे, श्रीपतपिंपरीचे विद्यमान सरपंच रामराजे ताकभाते, ग्रामपंचायत सदस्य बापु तापकीरे, गुळपोळी गावचे मा. सरपंच महादेव चिकणे तसेच पिंपरी-चिंचवड येथील उद्योजक बाळासाहेब काकडे हे मान्यवर उपस्थित होते.