शबनम न्युज / पुणे
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. सौरभ राव यांनी कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्रास सुरू झाल्याने कोरोना चाचणी केली. सोमवार (दि.17) रोजी या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
एक वर्ष कोरोना रुग्णांची सेवा केल्यानंतर 16 मार्च 2021 रोजी सौरभ राव यांना कोरोनाची लागण झाली. कोरोना लसीकरणाचा पहिला डोस झाल्यानंतर राव यांना ही लागण झाली होती. त्यामुळे कोरोनाचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाला. परंतु शुक्रवार (दि.14) रोजी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर राव यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. लसीकरण झाल्यानंतर राव यांना त्रास होण्यास सुरुवात झाली. लसीकरणामुळे त्रास होत असेल असे राव यांना वाटले. परंतु त्रास अधिकच होत असल्याने कोरोना चाचणी केली, यात राव यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.