प्रतिनिधी | दिलीप सोनकांबळे
शबनम न्युज / रत्नागिरी
चक्रीवादळा मुळे रस्त्यावर तुटून पडलेल्या 33 के व्ही वीज वाहिनीचा धक्का बसून पती आणि पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील बोरज जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ सोमवारी (17 मे) संध्याकाळी ही घटना घडली. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.
Advertisement
बोरज घोसाळकरवाडी इथले प्रकाश गोपाळ घोसाळकर आणि त्यांची पत्नी वंदना प्रकाश घोसाळकर हे दोघे दुचाकीवरुन लोटे इथे गेले होते.
लोटे इथलं काम संपवून ते संध्याकाळी परतत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. बोरज जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ आले असता, वादळामुळे रस्त्यावर तुटून पडलेला 33 के व्ही वीज वाहिनीचा जोरदार झटका दोघांना बसला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Advertisement