पिंपरी चिंचवड – दि. १८ मे । अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांच्याकडून शासन निर्णय क्रमांक दक्षस-१००७ / प्र . क्र . ५४८ /नापू . डी. जाणे २००८ अन्वये पिंपरी-चिंचवड ज परिमंडळ विभाग अंतर्गत दक्षता कमिटी गठीत केल्याचे जिल्हाधिकारी कार्यलयाकडून दिनांक नुकतेच जाहीर करण्यात आले.
सदर समितीचे अध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे आहेत. नियुक्ती झालेल्या सदस्यांना अन्न धान्य वितरण अधिकारी तावरे , माजी आमदार विलास लांडे , नगरसेवक विक्रांत लांडे , आमदार अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.
ज परिमंडळ विभाग अंतर्गत दक्षता कमिटीमध्ये तीन महिला सदस्य श्रीमती आशा शिंदे, श्रीमती मुमताज इनामदार, श्रीमती दीपाली मुरकुटे, दोन विरोधी पक्ष सदस्य वैभवी घोडके, संजय धुतडमल, शिधावाटप कार्यलयाच्या कार्यक्षेत्रातील पाच नगरसेवक रजनीकांत गायकवाड, सचिन सोनावणे, लालबी शेख, आकाश काळभोर, नुरखान, राजेंद्र कर्नावट, इतर दोन सदस्य श्रीमती जयश्री काळभोर, महेश जवळकर, व अनुसूचित जातीचा एक प्रतिनिधी दीपक कांबळे, अनुसूचित जमातीचा एक प्रतिनिधी संजय अवसरमल आदींची नियुक्ती करण्यात आलेली आहे.