पुणे : दिनांक १८ मे २०२१ : बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्व अनन्यसाधारण असून विद्यार्थीदशेपासून प्रत्येकाने ते समजून घेणे गरजेचे आहे असे मत बौद्धिक संपदा तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध डिग्रसकर यांनी व्यक्त केले.यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) तर्फे बौद्धिक संपदा अधिकार या विषयावरील वेबिनारमध्ये बोलत होते.
यावेळी त्यांनी पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट, ट्रेडमार्क या विषयावर सविस्तर माहिती दिली. विशेष बाब म्हणजे हे सांगताना त्यांनी स्वतःचा पेटंट विषयीचा अनुभव,पेटंटची संपूर्ण प्रक्रिया तसेच एन्झरिच बायोटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही आस्थापना सुरु करण्यापर्यंतचा प्रवास सविस्तर सांगितल्याने विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदा अधिकाराबद्दलची कार्यप्रणाली समजण्यास सोपे झाले.
बौद्धिक संपदेचे सरंक्षण ही अतिशय महत्त्वाची बाब असून,उद्योजकांनी संशोधन केलेले उत्पादन,त्याचे तंत्रज्ञान,डिझाईन याचे वेळीच पेटंट केल्यास त्याला कायदेशीर पाठबळ प्राप्त होते ज्यामुळे भविष्यातील आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते. व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच बौद्धिक संपदा अधिकाराबद्दलची संपूर्ण माहिती करून घ्यावी, यामधील कायदेशीर नियम ,प्रक्रिया या बाबीदेखील समजून घ्याव्यात असेही डॉ. अनिरुद्ध डिग्रसकर यांनी सांगितले.
वेबिनारच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी आपल्या मनोगतात सध्याच्या डिजिटल युगाच्या काळात उद्योगजगतदेखील बौद्धिक संपदा अधिकाराबद्दल अधिक सजग झाले असून या क्षेत्रात अनेक रोजगारसंधी उपलब्ध होतात.
वेबिनारचे समन्वयक डॉ. पुष्पराज वाघ यांनी काम पाहिले, तर आभार एमबीए च्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी नम्रता कदम हिने आभार प्रदर्शन केले, या ऑनलाईन वेबिनारमध्ये आयआयएमएसचे सर्व अध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.