पुणे, दि. 18 : पुणे विभागातील 12 लाख 67 हजार 470 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 लाख 35 हजार 833 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 40 हजार 765 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 27 हजार 598 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.92 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 88.27 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयानी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 72 हजार 688 रुग्णांपैकी 8 लाख 86 हजार 318 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 71 हजार 21 आहे. कोरोनाबाधित एकूण 15 हजार 349 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.58 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.12 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 37 हजार 424 रुग्णांपैकी 1 लाख 11 हजार 361 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 458 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 605 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 34 हजार 644 रुग्णांपैकी 1 लाख 13 हजार 256 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार 818 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 570 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 1 हजार 648 रुग्णांपैकी 83 हजार 526 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 152 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 970 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 89 हजार 429 रुग्णांपैकी 73 हजार 9 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 316 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 104 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 9 हजार 237 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 208, सातारा जिल्ह्यात 756, सोलापूर जिल्ह्यात 2 हजार 633, सांगली जिल्ह्यात 1 हजार 265, तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 375 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 15 हजार 582 आहे. पुणे जिल्हयामध्ये 9 हजार 838, सातारा जिल्हयामध्ये 532, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 885, सांगली जिल्हयामध्ये 2 हजार 291 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 36 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरण प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 25 लाख 15 हजार 23, सातारा जिल्ह्यामध्ये 6 लाख 84 हजार 963, सोलापूर जिल्हयामध्ये 4 लाख 78 हजार 185, सांगली जिल्हयामध्ये 6 लाख 48 हजार 662 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 11 लाख 20 हजार 182 नागरिकांचा समावेश आहे.