शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना संशयितांच्या तपासणीकरीता पिंपरीतील एसके सोशल फाउंडेशनच्या वतीने जय गणेश वरदहस्त हौसिंग सोसायटीतील रहिवाशांची रविवार (दि. 16) रोजी सकाळी 10 वी स्वॅब टेस्ट घेण्यात आली. यावेळी 80 ते 100 रहिवाशांनी सहभाग घेतला.
स्वॅब टेस्टींगच्या माध्यमातुन संशयित कोरोना रुग्णांचा तपासणी अहवाल प्रलंबित न राहता जलद गतीने प्राप्त झाला त्यानुसार सर्व रहिवाशांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. याकामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाचे त्यांना सहकार्य लाभले. यावेळी डॉ.प्राजक्ता डॉ. राजवाडे.डॉ रेखा मोहिते.डॉ.भाग्यश्री नाळे. आश्विनी पवळ, सुधीर लेंदे, जय गणेश वरदहस्त हौसिंग सोसायटीचे चेअरमन ऋषिकेश कामटे,विशाल पवळ, राजन गुंजाळ, विजय नडविनकेरे ऐस के सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष शिवा कांबळे उपस्थित होते.