शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांचा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या सारिका ताई पवार यांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व रोहिणी ताई खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
मागील वर्षी त्यांनी एकनाथ खडसे समर्थनार्थ भाजपाच्या ओबीसी महिला मोर्चाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील महिला राष्ट्रवादीची ताकद वाढणार असून त्यांना महिलांचा मोठा पाठिंबा आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सारिका पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहरात पक्ष मजबुतीवर व महिला एकजुटी वर भर देण्यात येणार असून, आपण राष्ट्रवादीची शहरात मोठ्या प्रमाणात ताकद वाढविण्याचे कार्य करणार आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर सारिका ताई पवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा राष्ट्रवादी करिता जमेची बाजू असून पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीचा पाया भक्कम करण्यात खूप मोठी मदत होणार आहे.
यावेळी सारिका ताई पवार यांनी येणारा काळात शंभर ते दीडशे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचेही सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे दिग्गज राजकीय नेते सोबत सायमन डेव्हिड, प्रशांत बडगुजर, हरीप्रसाद वाबळे, महेंद्र पवार,योगेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.