आई गेली पण मुलीच्या शाळेची फी ठेवून गेली
शबनम न्युज / पिंपरी
देशात कोरोनाच संकट गडद आहे. हातावर पोट असणाऱ्यांना लॉकडाऊन मुळे मरण यातना भोगाव्या लागत आहेत.असंच एक कुटुंब माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांच्या महात्मा फुले नगर मध्ये राहत असून त्याच्यावर कोरोनामुळे खूप मोठे संकट ओढवले. हातावरचं पोट असणारे जाधव कुटुंब जनार्दन जाधव आणि कविता जाधव गेल्या दोन-तीन वर्षापासून कविता जाधव यांना असहाय्य आजाराने ग्रासले होते.वायसीएम रुग्णालय येथे त्याचा उपचार चालू होता पण कोरोना ने कहर केला वायसीएम रुग्णालय कोव्हीड समर्पित झाले. लॉक डाउनमुळे काम ही गेल आणि वायसीएम हॉस्पिटल नोन कोविड रुग्णांसाठी बंद असल्याने मोफत उपचार ही नाही.अशा दुहेरी संकटात हे कुटुंब सापडले. मागील वर्षी कोरोना संकट थोडं कमी झाल म्हणून गेल्या जानेवारी महिन्यापासून परत वायसीएम येथे उपचार चालू केले . पण म्हणतात ना संकट कधी पाठ सोडत नसतं परत वायसीएम रुग्णालय कोरोना च्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वसामान्य रुग्णांसाठी बंद झाले. एक तर हातावरचे पोट, काम नाही, खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पैसा नाही अशा दुहेरी संकटात हे कुटुंब सापडले . आणि अशातच कोरोना च्या दुसऱ्या लाटेमध्ये म्हणजे सात दिवसांपूर्वी त्या महिलेचा राहत्या घरी अल्पशा आजाराने मृत्यू झाला.परिस्थिती वाईटच कोरोनाचा कहर सर्वसामान्य कुटुंबीयांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.
अंत्यविधीच्या वेळी त्या कुटुंबीयांची माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी भेट घेतली असता कुटुंबियांकडून कळाले की, ज्या कंपनीत कविता जाधव कामाला होत्या त्या कंपनीकडे त्यांची काही पीएफची रक्कम बाकी होते.तातडीने त्या कुटुंबाला जितेंद्र ननावरे यांनी सांगितलं की, मी ही रक्कम तुम्हाला मिळवून देईल. त्याच्या दुसऱ्या दिवशीच जितेंद्र ननावरे व त्यांचे सहकारी रवींद्र ओव्हाळ ,सचिन पडदुने , सुनील इंगवले,रियाज शेख , शंकर डिडुळ व विठ्ठल खजूरकर सर्वांनी कंपनी प्रशासनाकडे दुसऱ्या दिवशी धाव घेतली, तेव्हा कळाले की कंत्राटदाराने त्यांचा पीएफ भरला नव्हता तो स्वतःच्या खिशात घातला होता कंपनी प्रशासन व संबंधित ठेकेदाराला बोलवले आणि त्याच्याकडून त्याच दिवशी कविता जाधव यांच्या पीएफ च्या रक्कमेचा धनादेश घेऊन त्यांच्या मुलीच्या हातात दिला. मुलीच्या हातात धनादेश दिल्यानंतर तिला गाडीतून परत घरी सोडताना त्या मुलीचे डोळे पाणावले.ती मुलगी म्हणाली आई गेल्यानंतर आमच्या शिक्षणाचे काय होणार हा विचार मी कालपासून करत होते . या धनादेशामुळे माझी कॉलेजची फी भरणं शक्य होणार आहे. आणि कुटुंबाला फार मोठा हातभार लागणार आहे.
जितेंद्र ननावरे यांनी समाजातील सर्वच घटकांना विनंती केली आहे कि, आत्ताची लढाई ही पोटापाण्याची व जगण्याची आहे.आपल्या आजूबाजूला अडचणीत असलेल्या प्रत्येक घटकाला आपण आधार द्या .