द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर जबरदस्त आहे. 2 मिनिटे 49 सेकंदा च्या या ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयी ने साकारलेल्या श्रीकांत तिवारी ची कथा दिसते. या सीझनमध्ये श्रीकांत तिवारी नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्पर्धी राजीचा सामना करणार आहे. विशेष म्हणजे, साऊथ स्टार सामंथा अक्किनेनी हिने यात राजी ची भूमिका साकारली आहे. एक फॅमिली मॅन व जागतिक दजार्चा गुप्तचर अशा दुहेरी भुमिकेत मनोज वाजपेयीला पाहणे चाहत्यांसाठी एक ट्रीट असणार आहे.‘द फॅमिली मॅन 2’ ही सीरिज 12 फेब्रुवारी 2021 रोजी अॅमेझॉन प्राइमवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार होती. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.येत्या ४ जून रोजी दि फॅमिली मॅन रिलीज होत आहे या सीरिजच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. मनोज वाजपेयी आणि समंथासोबत प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.