शबनम न्यूज / प्रतिनिधी
अंबाजोगाई (बीड): तालुक्यातील राजेवाडी येथील २४ वर्षीय तरुण आणि १८ वर्षीय तरुणीने झाडाच्या फांदीला एकत्रित गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१९) दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून त्या दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
अनिता शेषेराव राठोड (वय १८) आणि प्रवीण सुधाकर काचगुंडे (वय २४, दोघेही रा. राजेवाडी, ता. अंबाजोगाई) अशी आत्महत्या करणाऱ्या दोघांची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिता आणि प्रवीण हे दोघेही बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास आपापल्या घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी सकाळी अंदाजे ११ वाजेच्या सुमारास राजेवाडी शिवारातील गायरानाच्या उतारावरील लिंबाच्या झाडाला एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
Advertisement
प्रतिनिधि – दिलीप सोनकांबळे