शबनम न्यूज / प्रतिनिधी
राज्य सरकारच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने स्वतःचा लिक्विड मेडिकल ऑक्सीजन प्रकल्प उभारावा अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या पत्रात नाना काटे यांनी म्हटले आहे की यावर्षी कोरोना च्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात व आपल्या शहरात ऑक्सिजन औषध आणि बेड व्हेंटिलेटर चा तुटवडा निर्माण झाला होता त्यामध्ये आता covid-19 तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात असताना तिसऱ्या लाटे चा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन आणि औषधे आणि साहित्य मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे,
राज्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्ण मृत्युमुखी पडले ,आपल्या शहरात ही ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनला होता त्यामुळे आपल्या महानगरपालिकेने स्वतःच्या मालकीचा लिक्विड मेडिकल ऑक्सीजन प्रकल्प उभारावा ,दुसरे लाटेमध्ये पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये दाखल केलेल्या रुग्णांना साधारण 480 एमडी दर दिवशी ऑक्सिजनची गरज लागत होती सदरील मागणी पूर्ण करण्यासाठी पुणे जिल्ह्यातून व इतर जिल्ह्यातून 350 ते 380 टन ऑक्सिजन मागवावा लागत होता तर अवश्यक वेळी राज्यातून उर्वरित ऑक्सिजन आयात करून पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी covid-19 च्या येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटे साठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे .
यामध्ये राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्येक जिल्हा महानगरपालिका यांनी ऑक्सिजन निर्मितीसाठी स्वयंपूर्ण व्हावे अशा सूचना केल्या आहेत, यातील ऑक्सिजन जनरेशन प्लांट हा प्राथमिक स्तोत्र असून त्याऐवजी लिक्विड मेडिकल ऑक्सीजन वापर करता येईल ऑक्सीजन प्लांट महानगरपालिकेच्या वतीने उभारण्याच्या दृष्टीने विचार करावा आपल्या शहरासह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पुढील दहा वर्षाची गरज लक्षात घेता सुमारे 50 ते 100 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन स्तोत्र असा निर्माण करणे गरजेचे आहे ,लिक्विड मेडिकल ऑक्सीजन प्लांट उभारणीकरिता कोट्यवधी रुपये खर्च होणार आहे .
याकरिता आपल्या महापालिके सोबत पुणे महानगरपालिका आणि पुणे ग्रामीण जिल्हा परिषद यांना सोबत घेऊन हा प्रकल्प उभारता येईल का ? याची संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करावी जर चर्चेतून ऑक्सीजन प्लांट उभारणीकरिता तत्त्वतः मान्यता दिल्यास सदरचा प्लांट उभारणी करीता राज्य शासन व प्रशासकीय स्तरावर सर्व परवानगी घेऊन हा प्रकल्प तिसरी लाट येण्यापूर्वी चार ते पाच महिन्यांमध्ये पूर्ण करता येईल का ? यासाठी स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत असे नाना काटे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे