शरद पवार यांना सदानंद गौडा यांनी फोन करून लवकरच रासायनिक खतांच्या दरवाढीचा पुनर्विचार करण्याचे दिले आश्वासन
शबनम न्युज / मुंबई
कोरोना संकट काळात रासायनिक खतांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याने देशभरातील शेतकरी अडचणीत सापडला. रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पत्राद्वारे केली होती. केंद्रीय खत व रसायन मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना या प्रकरणी वैयक्तिकरीत्या लक्ष घालण्याची आणि किमतीतील वाढ लवकरात लवकर मागे घेण्याची विनंती शरद पवार यांनी मंगळवारी एका पत्राद्वारे केली.
या पत्राची दखल घेत केंद्रीय मंत्र्यांनी आज पवार शरद पवार सोबत फोनवर चर्चा केली. पत्रातील सूचनांचा अभ्यास करून पुढील दोन दिवसांत दरवाढ मागे घेण्याबाबतचा निर्णय घेऊ, असे त्यांनी शरद पवार यांना आश्वासन दिले.