शबनम न्युज / पिंपरी
माहे २० मे २०२१ ची मा. महापालिका सभा तहकूब करण्यात यावी,अशी मागणी पिंपरी चिंचवड मनपा विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात नमूद केले आहे कि, पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे त्यामुळे हि सभा सभागृहात मोजक्या पदाधिका-यांच्या उपस्थित घेतली असती तरी चालले असते. माहे एप्रिल महिन्याची विशेष सभा दिनांक ३० एप्रिल रोजी घेतली तेव्हा कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती तेव्हा मात्र ती मा. महापालिका सभा सभागृहात सभा घेतली गेली. परंतु आज कोरोना रुग्णांची संख्या कमी असताना सुध्दा ऑनलाईन सभा का घेण्यात आली आहे, हा प्रश्न पडलेला आहे. ऑन लाईन सभेमध्ये सर्वांनाच महत्वांच्या विषयावर आपले मत मांडता येत नाही.
त्याच प्रमाणे कॉग्रेस पक्षाचे खासदार राजीव सातव, माजी नगरसदस्या चारुशिला कुटे, भाजपचे निष्ठावान जेष्ठ कार्यकर्ते प्रमोद निसळ तसेच परवा महाराष्ट्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळात महाराष्ट्रातील नागरीक मृत्यूमुखी पडलेले आहेत. मुंबई समुद्रात सुध्दा सुमारे ४६ कामगारांचा बुडून मृत्यू झालेला आहे. त्या सर्वांना श्रद्धांजली वाहून सदरची मा. महापालिका सभा तहकूब ठेवून आपल्या सोयीच्या दिनांकास मा. यशवतराव चव्हाण सभागृहामध्ये घेण्यात यावी. म्हणजे सर्वांना या सभेत भाग घेऊन आपली मते मांडता येतील. असे हि दिलेल्या निवेदनात राजू मिसाळ यांनी म्हंटले आहे.