शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील जमिनींवरील आकर्षित अनधिकृत बांधकामे 25% बाजारमूल्य भरून अनधिकृत करण्यात यावी, असे मागणीचे निवेदन चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात आमदार लक्ष्मण जगताप यांनी म्हटले आहे की, राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 19 मे 2019 रोजी झालेल्या बैठकीत भोगवटादार वर्ग -2 मधील इनाम वतन जमिनी वरील सदर नजराना व कुपोषित बांधकामे नियमित करण्यासाठी प्रचलित बाजारभावाच्या मूल्याचा 75 टक्के आकारला जात असताना गुंठेवारी कायद्यांतर्गत केवळ 25 टक्के मूल्य शुल्क रक्कम लाभार्थ्याने अदा केल्यास सदर बांधकाम नव्या अटी सह महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ नियंत्रण) अधिनियम 2001 च्या गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य शासनाने त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने जागा मालकांकडून त्यावेळेस ज्या बाजार भावाने जागा अधिग्रहित केल्या होत्या. त्याच्या 25% मूल्य शुल्क आकारून मूळ जागामालक व अनधिकृत बांधकाम धारकांची बांधकामे नियमित करावीत. जेणेकरून सदर अकृषिक अनधिकृत बांधकामे अधिकृत केल्यास उद्योग नगरीतील अनेक नागरिक व श्रमिक वर्गाला दिलासा मिळेल.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील अकृषिक अनधिकृत बांधकाम धारकांना व जागामालकांना न्याय देण्याकरिता तातडीने संबंधितांना योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश द्यावेत. असेही आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.