किती व कशी वाट पहायची त्यांना माहीत आहे त्यामुळे २५ वर्ष वेळ कसा काढायचा हे नारायण राणे शिकवतील…
शबनम न्युज / मुंबई
राज्यसरकारची कोरोना काळातील कामाची प्रशंसा जगभर आणि राज्यभर होतेय परंतु आघाडीत वाद आहे असे वाटत असेल त्यांनी त्याचा आनंद घ्यावा महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.
कोमल तेल होगा ना राधा नाचेगी… आघाडी सरकार भक्कम आहे… लोकांचा विश्वास आहे… सरकारची कामगिरी लोकांना पसंत पडलीय असे स्पष्ट मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
महाविकास आघाडी सरकार बनताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे सरकार २५ वर्ष टिकेल असे सांगितले होते त्यामुळे विरोधकांनी तोपर्यंत वाट पहावी असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.
नारायण राणे हे भाजपसोबत आहेत. किती व कशी वाट पहायची त्यांना माहीत आहे. त्यांच्याकडून भाजपने शिकले पाहिजे. २५ वर्ष वेळ कसा काढायचा हे नारायण राणे शिकवतील अशी खोचक टिकाही नवाब मलिक यांनी केली आहे.