पुणे : तेरा वर्षाच्या मुलानेच वडिलांचा रागाच्या भरात खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दस्तगीर (वय 38) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सूरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दस्तगिर हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. दरम्यान, त्यांच्या मुलीचे आणि मुलामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले होते यावेळी त्यांनी मुलाला हाताने मारहाण केली. वडिलांनी आपल्याला मारहाण केली या रागातून त्याने थेट घरात आसलेला चाकुच वडिलांच्या पोटात खुपसला आणि त्यांचा खून केला आहे
कात्रज भागात असलेल्या जांभुळवाडीत ही घटना घडली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे
प्रतिनिधि
Advertisement
दिलीप सोनकांबळे