पिंपरी, दि. २१ मे २०२१ :- आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवाद आणि हिंसाचाराचा सर्व शक्तिनिशी मुकाबला करण्याची प्रतिज्ञा आज पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचा-यांनी घेतली.
महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
दिवंगत पंतप्रधान, भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आहे. याप्रसंगी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले आणि सामुहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. सर्व मानव बंधूमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकविण्याची, तो वर्धिष्णु करण्याची तसेच मानवी जिवीत आणि मुल्ये धोक्यात आणणा-या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करण्याची प्रतिज्ञा उपस्थितांनी घेतली. प्रतिज्ञापत्राचे वाचन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.