कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा;यंत्रणा प्रभाविपणे राबवा
– उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती , दि. 22 : बारामती तालुक्यामध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार घेऊन यंत्रणा प्रभाविपणे राबवत, कोरोनाची संभाव्य लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामती नगरपरिषद नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती निता फरांदे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता विश्वास ओव्हाळ, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग पुणे धोडपकर, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, माजी जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करुन सर्व विभागांनी प्रभाविपणे यंत्रणा राबवावी. या लाटेमध्ये लहान बालके बाधित होण्याचा धोका संभावतो आहे, तरी त्यांच्यासाठी रुग्णालयामध्ये स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्यायबाबत कार्यवाही करावी. रुग्णालयात सर्व सुविधा असणे आवश्यक आहे, बारामती तालुक्यतील सर्व रुग्णालयामध्ये फायर व ऑक्सीजन ॲडीट वेळेवर करुन घ्यावे, सर्व रुग्णालयामध्ये जनरेटरची सुविधा असणे आवश्यक आहे. रुग्णांलये स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. कोविड सेंटर तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. सध्या कोरोना रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत आहे, ही बाब दिलासादायक आहे. तथापि मृत्यू दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. कोणत्याही रुग्णांलयामध्ये ऑक्सीजनची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी अगोदरच नियोजन करुन ठेवावे, निधीची कमतरता कमी पडू देणार नाही. म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव कोरोना रुग्णांमध्ये वाढत आहे. या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. या रोगासाठीच्या औधषांच्या पुरवठ्यामध्ये गैरप्रकार न होता योग्य वापर व नियोजन करण्यात यावे. कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना म्युकरमायकोसिस अथवा अन्य काही लक्षणे दिसल्यास याची माहिती दूरध्वनीवरुन घेण्यात यावी.
उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यामधील शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच ऑक्सिजन, म्युकरमायकोसिसच्या औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीपूर्वी मॅगनम इंटरप्राइजचे विकास सराफ , बारामती यांचे मार्फत आंगणवाडी सेवीका व सर्वे करणाऱ्या पथकाला एन 95 व सर्जिकल मास्क, फेश शिल्ड, व सॅनिटायझर, फेरोरा इंडिया प्रा. लि., बारामती यांच्याकडून 100 बेड सेट व 20 ऑक्सीमीटर, डॉ. गौतम राजे, लंडन यांच्याकडून 12 स्ट्रेचर्स, व इंदू केअर फार्माचे डॉ. रामदास कुटे यांच्याकडून सिल्वर ज्यूबिली रुग्णालयास शतप्लस च्या 500 बॉटल (इम्यूनिटी डोस) व श्रीमती सुरिया अत्तार यांच्या कडून 10 हजार रूपयांचा धानादेश देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांना सूपूर्द करण्यात आले.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. यावेळी बारामती नगरपरिषद नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती निता फरांदे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता विश्वास ओव्हाळ, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग पुणे धोडपकर, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, माजी जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेता सचिन सातव आदींमान्यवर उपस्थित होते.