शबनम न्युज / पुणे
पुणे विभागातील 13 लाख 25 हजार 539 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 लाख 77 हजार 496 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 23 हजार 374 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 28 हजार 583 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.93 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 89.72 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 88 हजार 916 रुग्णांपैकी 9 लाख 14 हजार 958 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 58 हजार 197 आहे. कोरोनाबाधित एकूण 15 हजार 761 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.59 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.52 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 44 हजार 843 रुग्णांपैकी 1 लाख 21 हजार 525 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 20 हजार 583 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 735 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 42 हजार 189 रुग्णांपैकी 1 लाख 21 हजार 732 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 755 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 702 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 6 हजार 945 रुग्णांपैकी 89 हजार 954 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 876 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 94 हजार 603 रुग्णांपैकी 77 हजार 370 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 963 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 270 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 10 हजार 267 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 129 , सातारा जिल्ह्यात 1 हजार 782 , सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 585 , सांगली जिल्ह्यात 1 हजार 434 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 337 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 16 हजार 549 आहे. पुणे जिल्हयामध्ये 8 हजार 713, सातारा जिल्हयामध्ये 2 हजार 299 , सोलापूर जिल्हयामध्ये 2 हजार 705, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 376 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 456 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागामध्ये 21 मे 2021 पर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्हयातील 25 लाख 33 हजार 638 सातारा जिल्हयामधील 6 लाख 94 हजार 686 , सोलापूर जिल्हयामधील 4 लाख 84 हजार 651 , सांगली जिल्हयामधील 6 लाख 53 हजार 895 व कोल्हापूर जिल्हयामधील 11 लाख 28 हजार 429 नागरिकांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 81 लाख 55 हजार 100 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 14 लाख 77 हजार 496 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.