शबनम न्युज / अहमदनगर
आज अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील स्लॅब कलवर्टच्या बांधकामाची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाहणी केली. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून निळवंडे धरणाच्या बांधकामाला गती देण्याचे काम शासनाने केले आहे. हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत शासनस्तरावर सर्व सहकार्य केले जाईल. असे आश्वासन हि जयंत पाटील यांनी यावेळी दिले.
यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खा. प्रसादराव तनपुरे व जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
Advertisement