शबनम न्युज / मुंबई
“ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ लोकप्रिय राम-लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण यांच्या निधनामुळे मनाला भावतील अशी अवीट गोडीची गाणी देणाऱ्या राम – लक्ष्मण युगाचा अस्त झाला आहे”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
“संगीतकार राम-लक्ष्मण या जोडीने, दादा कोंडके यांच्या अस्सल मराठी मातीतील चित्रपटांपासून ते हिंदीतील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या मैने प्यार किया, हम आपके है कौन अशा अनेक चित्रपटांना दिलेले संगीत तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होते. महाराष्ट्र शासनाच्या लता मंगेशकर पुरस्काराने त्यांच्या योगदानाचा उचित सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या संगीतातून ते कायम संगीत रसिकांच्या स्मरणात राहतील”, असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
Advertisement