शबनम न्युज / उस्मानाबाद
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी उस्मानाबादमधील अनाथाश्रमातील दिव्यांग मुलींसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना संकटकाळात उस्मानाबाद येथील अनाथाश्रमातील ज्या दिव्यांग मुली कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या त्यांच्यासाठी सक्षणा सलगर यांनी एक उपक्रम हाती घेतला आहे. या मुलींना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आरोग्य कीट देण्यात येत आहे.
त्यामध्ये मास्क, सॅनिटायझर, हेअर ऑइल, सॅनिटरी नॅपकिन, टुथपेस्ट, टुथब्रश आदींसारख्या वस्तूंचा समावेश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सक्षणा सलगर यांनी जिल्ह्यातील गरजू दिव्यांग मुलींचे संगोपन करणाऱ्या सामाजिक संस्था, त्यांचे पालक या सर्वांच्या मदतीसाठी हा उपक्रम असून, गरजू दिव्यांग मुलींच्या मदतीसाठी आपण सदैव तयार असून त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सक्षणा सलगर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.