शबनम न्युज / पिंपरी
उद्योग नगरी पिंपरी चिंचवड मधील वाय सी एम हॉस्पिटल व खासगी कोविड रुग्णालय येथे म्युकरमायकोसिस वरील इंजेक्शन Inj.Amphotericin-B या इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा करावा, असे मागणीचे निवेदन चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात आमदार लक्ष्मण जगताप यांनी म्हटले आहे की, शहरात कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिस नावाचा बुरशीजन्य आजार हातपाय पसरत आहे. कोरोना ची दुसरी लाट आल्यानंतर या आजाराचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. अशा रुग्णांवर वाय.सी.एम. हॉस्पिटल व खासगी रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. रुग्णालयांमध्ये गंभीर अवस्थेतील रुग्णांना या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले Inj.Amphotericin-B इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
सध्याच्या परिस्थितीत शहरातील म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी सदर इंजेक्शनची गरज असल्याने मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. Inj.Amphotericin-B या इंजेक्शनचा पुरवठा आपल्या मार्फत वितरित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. असे असतानाही पिंपरी-चिंचवड मनपाचे वायसीएम रुग्णालयात अद्यापही सदर इंजेक्शन उपलब्ध झालेले नाही. सदर रूग्णालयात अद्यापपर्यंत दाखल झालेल्या 64 रुग्णांपैकी 23 रुग्णांवर उपचार सुरू असून दहा रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सद्यस्थितीत 31 रुग्ण या आजारावर उपचार घेत आहेत याआधीही covid-19 रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रेमडीसीवीर इंजेक्शन अभावीं 31 रुग्ण या आजारावर उपचार घेत आहेत. या आधीही covid-19 रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना इंजेक्शन अभावी नाहक त्रास सहन करावा लागला आहे. परिणामी काही रुग्ण दगावले गेले अशी स्थितीत पुन्हा उभी राहते की काय? असा प्रश्न पडत आहे.
इंजेक्शन अभावी रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. शहरात म्युकरमायकोसिस रुग्णांच्या संख्येत भर पडल्याने या रुग्णांना वेळेत उपचार देण्यासाठी Inj.Amphotericin-B या इंजेक्शनच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. परिणामी रुग्णांसाठी इंजेक्शनचा ही तुटवडा मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. शहरात इंजेक्शनच्या मागणी आणि पुरवठा चे समीकरण बिघडल्याने रुग्ण संख्येनुसार सदर इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून द्यावे.
म्युकरमायकोसिस संसर्ग पाहता शहरातील वाय सी एम हॉस्पिटल व सर्व खाजगी कोविड रुग्णालयातील रुग्णांना रेमडीसीवीर प्रमाणेच Inj.Amphotericin-B या इंजेक्शनचा तुटवडा भासू नये, म्हणून या आजारावरील इंजेक्शन व औषधांचा मागणीनुसार पुरवठा नियंत्रित करण्याबाबत आपल्या स्तरावरून तात्काळ संबंधितांना आदेश निर्गमित करावे. असेही आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.