शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
भटक्या ज्ञाती जमातीं च्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले , भोसरी येथील चक्रपाणी वसाहत व सदगुरू नगर या ठिकाणी मदारी, बहुरूपी, नंदीवाले, जोशी, तिरमली या भटक्या ज्ञाती जमातींची लोक पाल टाकून वास्तव्य करत आहेत. या ठिकाणी एकूण ३०० कुटुंब वास्तव्यास आहेत. या कुटुंबातील सर्व सदस्यांची संख्या जवळपास २००० च्या आसपास आहे. या ज्ञाती मुख्यतः भिक्षा मागणे, डोंबाऱ्याचा खेळ करणे, जादूचे खेळ करणे, नंदीबैल घेऊन घरोघरी भिक्षा मागणे अशाप्रकारची कामं करून आपला उदरनिर्वाह करत असतात. कोरोना महामारीने त्यांच्या पुढे पुन्हा एकदा मोठे संकट उभे केले आहे. या लोकांना लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहासाठी सध्याच्या परिस्थितीत घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे या ज्ञाती जमातींवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
आत्ता आलेल्या वादळामुळे या वस्तीमधील झोपड्यांचे नुकसान झाले होते.
संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाच्या वतीने मंडळाचे कायदेशीर सल्लागार व नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, भोसरीचे स्थानिक नगरसेवक राजेंद्र लांडगे व सत्संग फाऊंडेशनचे राजेश शिरोळे यांच्या हस्ते त्तेथील सर्व कुटुंबांना त्यांच्या झोपड्यांवर टाकण्यासाठी ‘फ्लेक्स आणि गहू -तांदूळ व रेशन कीटचे वाटप करण्यात आले.
या सर्व लोकपयोगी उपक्रमांचे नियोजन मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते महेश मिरजकर, प्रमोद बरडीया, दुर्गेश मिरजकर, तेजस तिकोने, यश बरडीया व रोहित डांगे आदिंनी केले.