भारतात एकही फार्मा कंपनी अशा दुर्धर आजारासाठी ड्रग बनवत नाही ही खंत
पुणे | प्रतिनिधि |
वेदिका अवघी ८ महिन्यांची असताना तीला SMA Type – 1 या दुर्धर आजाराचे निदान झाले आणि वेदिका च्या आई वडिलांच्या पाया खालची जामीनच सरकली , या आजारासाठी देण्यात येणाऱ्या ( Zolgensma ) लसीची किंमत सुमारे १६ कोटी रुपये आणि आयात शुल्क वेगळे , ही लस देण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही असे डॉक्टरांनी सांगून टाकले आणि मग सुरू झाला १६ कोटी रुपये जमा करण्याचा खडतर व अवघड असा प्रवास.
एवढी रक्कम कुठून आणणार असा प्रश्न पालकांसमोर उपस्थित होता. पालकांनी नागरिकांना आवाहन केले आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातून मदतीचा ओघ सुरु झाला. वेदिका अकरा महिन्यांची होण्यापूर्वीच नागरिकांच्या सहाय्याने तब्बल १६ कोटी रुपये जमा झाले. तिच्या पालकांनी केलेल्या विनंती नुसार केंद्र व राज्यसरकारने देखील आयात शुल्क माफ केला आहे.
आता प्रतीक्षा आहे ती अमेरिकेहून लस येण्याची. कारण लस आल्यानंतरच वेदिकावर उपचार केले जाणार आहेत. यामुळे हजारो नागरिकांची मदत आणि शुभेच्छांच्या बळावर अकरा महिन्यांची चिमुकली वेदिका त्या भीषण आजारावर मात करणार हे नक्की झाले आहे.
या लसीवरील आयात शुल्क माफ करण्या करिता वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य भवन विभागाशी पत्रव्यववहार केला होता. याची दखल घेवुन सरकारने आयातशुल्क व कर माफ केले आहे अशी माहिती वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी दिली. तर या कामासाठी मराठी अभिनेता निलेश दिवेकर यांचे खूप सहकार्य झाल्याचे शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वेदिकावर उपचार सुरु आहेत. वेदिकाला आवश्यक असलेल्या आर्थिक मदतीची गरज आता पूर्ण झाली आहे. रुग्णालयाच्या वतीने अमेरिकेतील लसनिर्मिती कंपनीकडे लसीची मागणी नोंदविण्यात आली आहे. येत्या दहा बारा दिवसांत ही लस रुग्णालयात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वेदिकाला ही लस दिली जाईल.
वेदिका च्या पालकांनी मानले जनतेचे आभार !
आपल्या सर्वांच्या मदतीमुळे माझ्या चिमुकलीला जीवदान मिळणार आहे. या लसीच्या मदतीने वेदिका पूर्णपणे ठणठणीत बरी होऊन तिचा पहिला वाढदिवस साजरा करू शकते. आमची तळमळ बघता समाजातील तळागाळातून मदतीचा ओघ सुरू झाला. आपण ही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आपापल्या परीने जितकी होईल तितकी मदत समाज माध्यमातून केली गेली या साठी सर्वांचे शतशः आभार..!! अशा भावना वेदिकाचे आई वडील स्नेहा व सौरभ शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केल्या.
वेदिकासाठीची पहिली लढाई सर करण्यात पत्रकारांचे पणं खुप सहकार्य लाभले..!
गौरव साळुंखे , संजय भेंडे , विभु लिमये , शिवानी धुमाळ , नुपूर पाटील , संतोष आंधळे , अभिजित कारंडे , नाझिम मुल्ला , ज्ञानदा कदम , श्रीकांत बांगळे , अमृता दुर्वे , दिपक चव्हाण , दत्ता नेटके , गोविंद वाकडे , मनोज मोरे , प्रमोद यादव , मोहन दुबे , मानसी देशपांडे , मंदार गोंजारी , हर्शदा स्वकुल , नम्रता वागळे , वृषाली यादव , प्रसन्ना जोशी ,
दिपक पलसुले , रोहित खर्गे , विनोद पवार , अनिल कातळे , सुनिल कांबळे , बाळासाहेब ढसाळ , रीहान सय्यद, शबनम सय्यद , लीना माने , महा e न्यूज , pcb न्यूज , शिवनेर एक्स्प्रेस , बबन पवार ,विनय लोंढे , दीपक साबळे , प्रशांत साळुंखे , दै.सकाळ , दै.पुढारी , दै.लोकमत , दै.प्रभात , दै.सामना , बुलंद राष्ट्रवादी , झुंज न्यूज , mpc न्यूज. सर्व न्यूज चॅनल्स वेब पोर्टल्स , यूट्यूब चॅनल्स , दैनिक , साप्ताहिक प्रिंट , इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांचे आभारी आहोत. सर्वच माध्यमांमुळे हे १६ कोटी रुपये जमवणे शक्य झाले असल्याचे वेदीकाचे वडील सौरभ शिंदे यांनी सांगितले