रिक्षा चालक मला मालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : बाबा कांबळे
महाराष्ट्र शासनाने रिक्षा चालक मालकांसाठी दीड हजार रुपये अनुदान जाहीर केले असून याबाबत महाराष्ट्र रिक्षा पंचायत च्या वतीने पिंपरी येथील खराळवाडी येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत कार्यालय मध्ये रिक्षा चालक मालकांसाठी मोफत विनामूल्य फॉर्म भरून देण्यात आले असून विनामूल्य मोफत मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन नुकतेच महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी रिक्षाचालकांचे फॉर्म भरून ज्या रिक्षाचालकांचा अर्ज पूर्ण झालेला आहे त्या अर्जाची प्रत रिक्षा चालकांस देऊन या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले ,
महाराष्ट्र रिक्षा पंचायत रिक्षा ब्रिगेड रिक्षा आरोग्य दूध या संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,
यावेळी रिक्षा ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब ढवळे,धनंजय कूदळे,लक्ष्मण शेलार, विजय धगारे, संजय दौंकर, अविनाश जोगदंड, तुषार लोंढे, रवींद्र लंके, अनिल शिरसाट, जाफर शेख,आदी उपस्थित होते.
रिक्षाचालक मालकांना महाराष्ट्र सरकारने दीड हजार रुपये अनुदान जाहीर केले असून, त्यासाठी परिवहन विभागाच्या अंतर्गत लिंक प्रसिद्ध करण्यात आली असून या लिंकवर ते रिक्षाचालकांनी जाऊन आपल्या फॉर्म भरण्याचा आव्हान सरकारच्या वतीने करण्यात आले आहे, परंतु अनेक रिक्षाचालकांकडे ही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे महाराष्ट्र रिक्षा पंचायत च्या वतीने ही सुविधा विनामूल्य मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे, या योजनेचा लाभ पिंपरी चिंचवड शहरातील सर्व रिक्षा चालक मालकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले आहे.
ज्या चालक मालकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी खालील ठिकाणी संपर्क करावा असे आवाहन यावेळी, संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे
किंवा खालील वेब साईट वर आपली नोंद करता येईल
hptt://transport.maharashtra.gov.in
संपर्क
जनसंपर्क कार्यालय : भक्ती कॉम्प्लेक्स डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पाठीमागे ऑफिस नंबर १ व 13 खराळवाडी पिंपरी पुणे 18, 9850802424 , 7276232424 या नंबर वर संपर्क करावा,