शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
MIDC पोलीस स्टेशनला भोसरी पोलीस स्टेशनचा काही नागरी भाग जोडावा अशी मागणी नगर सेवक संजय वाबळे यांनी महाराष्ट्र राज्य चे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे संजय वाबळे यांनी निवेदन द्वारे म्हंटले आहे कि MIDC भोसरी पोलीस स्टेशन लगत इंद्रायणीनगर पेठ क्र. १, ३, लांडगेनगर, गुरुविहार कॉलनी, जय गणेश साम्राज्य हा नागरी वसाहतीचा भाग पोलीस स्टेशन इमारतीपासून ५०० मी. अंतरावर आहे हा भाग ४ कि.मी. पेक्षा अधिक अंतर असणाऱ्या भोसरी पोलीस स्टेशनला जोडला गेल्याने या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे नागरिकांची मोठी गैरसोय थांबविण्या करीता सदरचा भाग MIDC भोसरी पोलीस स्टेशनला जोडण्यात यावा या कमी आपण आपल्या स्तरावरून निर्देश देण्यात यावेत. अशी मागणी नगर सेवक संजय वाबळे यांनी केली आहे.
Advertisement