शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
कॉग्रेसचे खासदार राजीव सातव यांना ऑनलाईन सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी महाराष्ट्रातील माळी समाजाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
खासदार राजीव सातव यांच्या निधनाने राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि सातव परिवारावर जेवढा मोठा आघात झाला आहे तेवढाच आघात माळी आणि देशातील तमाम ओबीसी समाजवरही झाला आहे.राजीव सातव यांच्यामध्ये एक उमदे नेतृत्व होत.त्यांनी नेहमी पक्षासह देशभरातील ओबीसी समाजाचं उत्तम काम केले. राजकारणात त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. राजीव सातव यांना देशभरातील ओबीसी समाजाची एक वज्र मूठ बांधण्याचे स्वप्न होते त्यांच्या निधनाने ते अपूर्ण राहिले. त्यांच्या अकाली निधनाने ओबीसी समाज पोरका झाला आहे.अशी भावना माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी व्यक्त केली.चिंचवड येथील महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑनलाइन श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते
यावेळी अविनाश ठाकरे बोलत होते. आपल्या भावना व्यक्त करताना उद्योजक दीपक कुदळे म्हणाले की राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे यावर विश्वास बसत नाही. अत्यंत शांत स्वभावाचे, पक्षाशी निष्ठा असणारे, समाजावर प्रेम करणारे,कामाच्या जोरावर पक्षात विविध जबाबदाऱ्या भूषवणारे, चार वेळा संसदरत्न पुरस्कार मिळून सुद्धा त्याचा अविर्भाव न करणारे राजीव सातव यांचे एवढ्या कमी वयात निधन झाल्याने ओबीसी समाजाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक चेतन भुजबळ आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले राजीव सातव हे एक लढवय्या नेता होते पण कोरोनाविरुद्धची लढाई ते हरले.राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी राजीव सातव यांच्यावर नेहमीच मोठ्या विश्वासाने जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ती जबाबदारी प्रत्येकवेळी उत्तमरितीने पार पाडून नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवला. वंचित, मागास समाजाचे प्रश्न ते मोठ्या हिरीरीने मांडत असत. त्यांच्या निधनाने आपण एक तरुण नेतृत्व गमावले आहे.राज्यातील विविध जिल्ह्यातून शोकसभेसाठी उपस्थित असणाऱ्या माळी समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.हणमंत माळी ,आण्णा कुदळे आण्णा गायकवाड,तुकाराम माळी ,गणेश दळवी,मृणाल ढोले,शालिनी बुंधे,संतोष केणे ,गोविंदराव डहाके,वसंतराव मुंढे,राजू जाधव, भानुदास माळी,अपर्णा डोके,संतोष लोंढे, सुहास गार्डी, दत्तात्रय बाळसराफ, दिपक कुदळे ,हिरामण भुजबळ, अरूण तिखे, दिपक जगताप,अतुल क्षीरसागर,राजेश कर्पे, प्रदीप जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शोक सभेचे प्रास्ताविक महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी यांनी केले तर समारोप कार्याध्यक्ष हिरामण भुजबळ यांनी केला.सुत्रसंचालन उपाध्यक्ष महादेव भुजबळ यांनी केले.