शबनम न्यूज / पिंपरी
महानगरपालिकेच्या लसीकरण मोहिमेविषयी शहरातील सर्व जनतेला पारदर्शकपणे संपूर्ण माहिती मिळणे आवश्यकअसल्याचे नगर सेवक भाऊसाहेब भोईर यांनी म्हंटले आहे या करीता जागतिक निविदा काढून लस खरेदी करण्यापासून ते नागरिकांना लस देण्यापर्यंतची प्रक्रिया काय असणार आहे, या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा लवकरात लवकर बोलवावी. अशी मागणी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी महापौर यांच्याकडे केली आहे .
दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात भाऊसाहेब भोईर यांनी म्हंटले आहे कि करोना साथीच्या दुसऱ्या लाटेने पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात थैमान घातलेले आहे. सध्य परिस्थितीत बाधितांचा आकडा कमी होताना दिसत आहे. परंतु, शहरातील करोना प्रतिबंधक लसीकरण एकूण लोकसंखेच्या प्रमाणात खूपच कमी झालेले आहे. करोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असल्यामुळे, लसीकरणाचे काम खूप धिम्या गतीने चालू आहे.
महानगरपालिका क्षेत्रात सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महानगरपालिका लवकरच आंतरराष्ट्रीय निविदा काढणार असल्याचे आपले वक्तव्य, वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्हाला कळाले. या संदर्भात मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सदर निविदा काढण्यासाठी राज्य सरकारच्या कोणत्याही परवानगीची गरज नाही असा निर्वाळा दिलेला आहे.
लस खरेदी करण्याची जागतिक निविदा काढण्याआधी, महानगरपालिकेतील जनतेला नक्की किती लसीचे डोस पाहिजेत, लस उत्पादक कंपनीला कोणकोणत्या राष्ट्रीय-अंतराष्ट्रीय मान्यता असल्या पाहिजे, लसीचा पुरवठा, हाताळणी, साठवणूक करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाची आवश्यकता लागणार आहे, लसीची सर्वात कमी किंमत ठरविण्यासाठी कोणते मानांकन वापरले गेले पाहिजे, लसीची वितरण व्यवस्था कशी असली पाहिजे, लस आल्यावर अजून किती नवीन लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यास लागणार आहे. १२ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण कसे केले जाईल.या सर्व मुद्यांवर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणे अत्यंत महत्वाचे आहे.
महानगरपालिकेच्या लसीकरण मोहिमेविषयी शहरातील सर्व जनतेला पारदर्शकपणे संपूर्ण माहिती मिळणे आवश्यक आहे.