शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी येथील वाढती लोकसंख्या पाहता येथील समशान भूमी मध्ये विद्युत दाहिनी आवश्यक असल्याचे कामाची दखल घेत या परिसरातील राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू बनसोडे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे कडे दापोडी फुगेवाडी परिसरातील स्मशानभूमीत विद्युत दाहिनी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समिती मार्फत विद्युत दाहिनी बसविण्यास मान्यता मिळाली आहे या विद्युत दाहिनी च्या कामाची संबंधित अधिकाऱ्यां मार्फत नुकतीच पाहणी करण्यात आली नगरसेवक राजू बनसोडे यांच्या प्रयत्नातून या कामास सुरुवात होणार आहे.
Advertisement