शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या थेरगाव येथील उभारण्यात आलेल्या रुग्णालयाचे खासगीकरण करू नये तसेच महापालिका वतीने कंत्राटी डॉक्टर ,नर्स, वॉर्ड बॉय , मावशी यांचेसह इतर कर्मचाऱ्यांची भरती करून ते कर्मचारी सदर रुग्णालयास कर्तव्य सेवेसाठी तैनात करावे अशी विनंती करणारे पत्र प्रभाग क्रमांक 23 च्या विद्यमान नगरसेविका व शिक्षण समिती सभापती मनीषा पवार यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात मनिषा पवार यांनी म्हटले आहे की पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अत्यंत चांगल्या प्रकारे थेरगाव येथे रुग्णालय विकसित केले असून सद्यस्थितीत कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णालय लोकार्पण करणे खूप गरजेचे आहे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित रूग्णालयात मनुष्यबळाची देखील कमतरता आहे परंतु कोरोना महामारी च्या नावाखाली महापालिका प्रशासनाला हाताशी धरून करोडो रुपयांची लूट केल्याचा प्रकार स्पर्श हॉस्पिटल ने केलेला आहे हे सर्वश्रुत आहे त्यामुळे थेरगाव येथील रुग्णालयाचे खाजगीकरण न करता महानगरपालिके मार्फत कंत्राटी डॉक्टर नर्स वॉर्ड बॉय , मावशी यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची भरती करून ते कर्मचारी सदर रुग्णालयास कर्तव्य सेवेसाठी तैनात करावे अशी मागणी मनिषा पवार यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे