शबनम न्यूज / पिंपरी
कोरोनाविषाणू चा वाढता प्रादुर्भाव व लॉक डाउन ची स्थिती यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे या सर्व परिस्थिती ची दखल घेत पिंपरी चिंचवड शहर युवासेना वतीने गरजू नागरिकांना एक मदतीचा हात दिला आहे. चिंचवड विधानसभा युवासेना अधिकारी विश्वजीत बारणे यांच्या नेतृत्वात पिंपरी-चिंचवड शहरातील शिवकॉलोनी ,वाकडरोड ,थेरगांव या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर युवासेनेच्यावतीने गरजूंना अन्न धान्य किट वाटप करण्यात आले.
या प्रसंगी चिंचवड विधानसभा युवासेना अधिकारी विश्वजीत बारणे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदू सुतार ,विजय पाटील,शिवसेना महिला पदाधिकारी सौ.पुष्पा तारू ,नूरजहाँ शेख,युवासेना पदाधिकारी संग्राम धायरीकर,जयेश केदारी ,विक्रम झेंडे, आकाश जाधव, योगेश ननावरे आदी उपस्थित होते
Advertisement