पुणे, दि. 25 : पुणे विभागातील 13 लाख 71 हजार 865 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 लाख 4 हजार 694 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 3 हजार 510 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 29 हजार 319 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.95 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.17 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 97 हजार 544 रुग्णांपैकी 9 लाख 39 हजार 746 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 41 हजार 669 आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 129 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.62 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.21 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 51 हजार 387 रुग्णांपैकी 1 लाख 27 हजार 292 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 21 हजार 294 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 801 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 45 हजार 912 रुग्णांपैकी 1 लाख 28 हजार 356 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 756 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 800 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 10 हजार 653 रुग्णांपैकी 94 हजार 185 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 270 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 99 हजार 198 रुग्णांपैकी 82 हजार 286 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 521 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 391 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 7 हजार 936 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 20, सातारा जिल्ह्यात 2 हजार 648, सोलापूर जिल्ह्यात 792, सांगली जिल्ह्यात 1 हजार 229 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 247 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 13 हजार 163 आहे. पुणे जिल्हयामध्ये 6 हजार 647, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 678, सोलापूर जिल्हयामध्ये 2 हजार 312, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 313 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 213 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरण प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 25 लाख 57 हजार 224, सातारा जिल्ह्यामध्ये 7 लाख 2 हजार 767, सोलापूर जिल्हयामध्ये 4 लाख 95 हजार 844, सांगली जिल्हयामध्ये 6 लाख 70 हजार 207 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 18 लाख 8 हजार 871 नागरिकांचा समावेश आहे.