मायमर हॉस्पिटलमधील तृतीय व चतुर्थ श्रेणी आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप मागे
शबनम न्यूज / मावळ
कोरोना काळात हे कोरोना योद्धे आपल्या जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या हक्कासाठी त्यांच्यासोबत उभं राहणं, त्यांना न्याय मिळवून देणं हे माझे कर्तव्य आहे असे प्रतिपादन मावळ चे आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.
तळेगाव दाभाडे शहरातील मायमर हॉस्पिटलमधील तृतीय व चतुर्थ श्रेणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय व हक्कांसाठी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मावळ चे आमदार सुनील शेळके यांनी हि यात सहभाग घेतला .यावेळी संवाद साधतांना त्यांनी वरील उदगार काढले या संपाच्या माध्यमातून न्याय मिळवणे हा प्रामाणिक हेतू सर्वांचा होता. असे हि सांगितले
मायमर हॉस्पिटल व्यवस्थापन, प्रशासन, कर्मचारी प्रतिनिधी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांसमवेत झालेल्या आजच्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. तर काही मागण्या आगामी काळात पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासन व्यवस्थापनाकडून देण्यात आले
मायमर हॉस्पिटलच्या आश्वासनानंतर कर्मचारी यांनी हा संप तात्काळ मागे घेतला. या वेळी आमदार सुनील शेळके यांनी आपल्या प्रतिक्रिया देतांना सांगितले कि कोरोना काळात हे कोरोना योद्धे आपल्या जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या हक्कासाठी त्यांच्यासोबत उभं राहणं, त्यांना न्याय मिळवून देणं हे आमचे कर्तव्य आहे. त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या असल्या तरी अनेक मागण्या मान्य झालेल्या नाहीत. तरीही या कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य ओळखून सर्वसामान्यांना आवश्यक आरोग्य सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी दोन पावले मागे येत त्वरित सर्वजण कामावर रुजू झाले. त्या सर्व बंधू-भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो.
“कोरोनाच्या संकट समयी रुग्णसेवेचा हा वसा कायम ठेवत आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या. पुढील काळात देखील आपल्यासोबत मी ठामपणे उभा राहील. आपणां सर्वांना आपले हक्क व न्याय मिळवून देण्याची प्रामाणिक भूमिका ठेवुनच काम करील, असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी या वेळी दिला