नगरसेवक डब्बू आसवानी ,नगरसेविका उषाताई वाघेरे , नगरसेविका निकिता कदम यांच्या पाठपुराव्याला यश
शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगर पालिका वतीने राबविण्यात आलेल्या पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सदनिका वाटप कार्यक्रम मनपा कार्यालयात संपन्न झाला नगरसेवक डब्बु आसवांनी व नगरसेविका निकिता ताई कदम ,यांनी सतत सदनिका लवकरात लवकर द्यावा या संदर्भात मा . आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यानंतर काल मनपा आयुक्त यांनी संबंधित अधिकारी व प्रभागातील नगरसेवक डब्बुशेठ आसवांनी , नगरसेविका निकिता ताई कदम , नगरसेविका उषाताई वाघेरे , यांची बैठक बोलावली असता सदनिका ताबा देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
कोरोना महामारी मुळे आपल्याला जिल्ह्याचे पालक मंत्री तथा उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या हस्ते सदनिकाचा वाटपाचा कार्यक्रम करायचे होते परंतु शासकीय नियमानुसार करणे गरजेचे आहे त्यामुळे नगरसेविका निकिता ताई कदम , नगरसेवक डब्बुशेठ आसवांनी , नगरसेविका उषाताई वाघेरे यांनी आपले मत मांडले की बौद्ध पौर्णिमा आहे दिवस चांगला असल्यामुळे शासकीय नियमानुसार कमीत कमी 5 लोकांना संदनिकाच्या चाव्या देण्यात याव्यात अशी आयुक्तांनी मान्यता दिली व बौद्ध पौर्णिमेनिमित्त त्या सदनिकांचे वाटप सन्मानिय महापौर , प्रभागातील नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आले. उर्वरित सदनिकांचे वाटप लवकरच शासन नियमानुसार देण्यात येणार आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक 21 मिलिंदनगर पुनर्वसन प्रकल्प टप्पा क्रमांक 2 A/2 सदनिका वाटप कार्यक्रम बौद्ध पौर्णिमेनिमित्त मा महापौर उषा माई ढोरे , उपमहापौर हिराबाई नानी घुले , सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके , नगरसेवक डब्बुशेठ आसवांनी , नगरसेविका निकिता ताई कदम ,नगरसेविका उषा ताई वाघेरे , सामाजिक कार्यकर्ते अर्जुन भाऊ कदम शेखर महाडिक , अधिकारी पोरेडी साहेब , अण्णा बोडदे , पाठक मॅडम व लाभार्थी उपस्थित होते.
शासकीय नियमानुसार आज बौद्ध पौर्णिमे निमित्त 5 जणांना सदनिकांच्या चाव्या देण्यात आल्या व उर्वरित सदनिका धारकांना येत्या सोमवार पासून रोज 16 जणांना सदनिकांच्या चाव्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प कार्यालय चिंचवड याठिकाणी देण्यात येणार आहे अशी माहिती या वेळी नगरसेविका निकिता ताई कदम यांनी दिली
या वेळी नगरसेविका निकिता कदम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि बरेच दिवसापासून मिलिंदनगर पुनर्वसन प्रकल्प टप्पा क्रमांक 2 मधील A/2 इमारतीची संगणकीय सोडत व ताबा पावती देऊन आज जवळ जवळ दीड वर्ष झाले होते या मोठ्या कालावधी नंतर आज प्रभाग क्रमांक 21 मधील मिलिंदनगर मधील रहिवासींना सदनिकांच्या ताबा देतांना अत्यंत आनंद होत आहे.
जे.एन.एन.यु.आर.एम. आणि बी.एस.यु.पी. अंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने मिलिंदनगर, पिंपरी येथे ५ इमारती बांधण्यात आल्या होत्या. त्यातील २ इमारतीमधील सदनिकांचे हस्तांतरण आज सुरु झाले. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर मोठा कार्यक्रम टाळून प्रातिनिधिक स्वरूपात शेखर महाडीक, अशोक राजपूत, चॉंद खान, कासिमबी पठाण आणि सुनंदा साबळे या पाच जणांना सदनिका हस्तांतरण करण्यात आल्या.
सदर दोन इमारतींमध्ये प्रत्येकी ११२ सदनिका आहेत. इमारतीमध्ये जिन्याबरोबरच लिफ्टचीही व्यवस्था आहे. २७० चौरस फुटाच्या चटई क्षेत्राच्या सदनिकांमध्ये हॉल, किचन आणि संडास बाथरुम यांचा समावेश आहे. सात मजली इमारतीच्या तळ मजल्यावर वाहनतळ करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार माहिती व जनता संपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.