शबनम न्यूज / मुंबई
बनावटगिरी करुन… मिडियाला मॅनेज करुन… लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजप करतेय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
भाजपने तयार केलेल्या बनावट ‘टूलकीट’ वर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजप मिडिया हाऊस निर्माण करतेय तो त्यांचा अधिकार आहे. परंतु दोन्ही टूलकीट खरे आहे याचा भाजपने समोर येऊन खुलासा केला पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
देशभर बनावट लेटरहेड वापरुन टूलकीट तयार करण्यात आलेले आहे हे लोकं सांगत आहेत त्यामुळे भाजपचा फर्जीवाडा समोर आल्याचेही नवाब मलिक म्हणाले.
भाजपने जो फर्जीवाडा करुन देशभर घृणा निर्माण करण्यासाठी बनावट लेटरहेडचा वापर केला. त्यावर ट्वीटर इंडियाने मॅन्यूप्लेटेड इंडियाचा टॅग लावला आहे. भाजपकडे याबाबतचे खरी कागदपत्रे असतील तर दुरुस्त करून घ्यायला हवी होती परंतु उलट ट्वीटरवर सवाल भाजप उठवत आहे. खरे कागद असतील तर ते दाखवा नाहीतर होणार्या कारवाईला सामोरे जा असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे.