शबनम न्यूज / पिंपरी
आज सकाळी श्रावस्ती बुद्ध विहार फुगेवाडी येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त अभिवादन व मानवंदना करण्यात आली!आज जगावर कोरोना महामारीचं संकट असताना अखिल मानव जातीला वाचवण्यासाठी जागतिक मदतीचं, विश्वशांतीचं, सलोखा, सहकार्याचं वातावरण निर्माण करण्याची ताकद भगवान बुद्धांच्या विचारांमध्ये आहे.हे विचार आपण आचरणात आणू या! भगवान गौतम बुद्धांना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी कोरोनाच्या पार्श्भूमीवर कमी लोकांमधे अभिवादन करण्यात आले,प्रमुख उपस्थित तालीम प्रतिष्ठानचे संस्थापक मा अक्षय वाजे,तसेच भिमसाम्राज्य ग्रुप,फुगेवाडी,प्रतीक कांबळे,ऋत्विक बनसोडे,रोहन गाडे,आशिष गरुड,राम कांबळे,भूषण कांबळे उपस्थित होते.
Advertisement