पुणे, दि. 26 : पुणे विभागातील 13 लाख 86 हजार 263 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 लाख 13 हजार 342 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 97 हजार 465 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 29 हजार 614 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.96 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.60 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 330 रुग्णांपैकी 9 लाख 45 हजार 974 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 38 हजार 100 आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 256 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.63 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.57 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 53 हजार 506 रुग्णांपैकी 1 लाख 29 हजार 01 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 21 हजार 454 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 851 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 46 हजार 877 रुग्णांपैकी 1 लाख 31 हजार 644 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 405 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 828 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 11 हजार 934 रुग्णांपैकी 95 हजार 454 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 249 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 231 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 695 रुग्णांपैकी 83 हजार 990 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 257 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 448 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 8 हजार 648 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 786, सातारा जिल्ह्यात 2 हजार 119, सोलापूर जिल्ह्यात 965, सांगली जिल्ह्यात 1 हजार 281 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 497 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा–या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 14 हजार 398 आहे. पुणे जिल्हयामध्ये 6 हजार 228, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 909, सोलापूर जिल्हयामध्ये 3 हजार 288, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 269 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 704 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरण प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 25 लाख 64 हजार 705, सातारा जिल्ह्यामध्ये 7 लाख 8 हजार 50, सोलापूर जिल्हयामध्ये 5 लाख 7 हजार 22, सांगली जिल्हयामध्ये 6 लाख 72 हजार 652 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 11 लाख 42 हजार 26 नागरिकांचा समावेश आहे.