शिवसेना शाखा मोहननगर व विशाल यादव युवा मंच यांच्यावतीने रिक्षा चालकांना अन्नधान्य वाटप
शबनम न्यूज / पिंपरी
शिवसेना शाखा मोहननगर व विशाल यादव युवा मंच यांच्यावतीने आज दिनांक २६ रोजी समाजातील नागरिकांसाठी वेळोवेळी मदतीस धावून जाणारे ,रिक्षाचालक बांधवांसाठी अन्न धान्याचे जीवनावश्यक वास्तूचे वाटप करण्यात आले.
गेल्या वर्षीचा लॉक डाऊन तसेच यावर्षीच्या लाँकडाउन मध्ये स्थानिक रिक्षाचालकांचा व्यवसावावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला या कठीण परिस्थितीत त्यांच्या मदतीला युवा नेते विशाल यादव व नगरसेविका मीनल यादव यांनी मदतीचा हात दिला व या रिक्षा चालक कुटुंबांना अन्न धान्य वाटप केले.
यावेळी शिवसेना नगरसेविका सौ मीनल विशाल यादव ,शिवसेना विभागप्रमुख नानासाहेब काळभोर ,शाखाप्रमुख नागेशजी नामदे, विवेक पोटघन, सतीश चौधरी, हर्षल मेहेर, विराट भिलारे ,राजूशेठ खजिनदार , नितीनशेट अगरवाल ,शैलेश जी तांबे सर्व शिवसैनिक, परिसरातील रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .