शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि देशाचे नेतृत्व करुन केलेले कार्य कायम स्मरणात राहील असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथी निमित्त महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच नेहरुनगर पिंपरी येथील पुतळ्यास महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते, तर नेहरुनगर पिंपरी येथील कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य राहुल भोसले, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.