शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
वि आर देअर सोशल फाउंडेशन आणि शांतिदूत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 27 मे रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच दरम्यान भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. सदर रक्तदान शिबिर सावित्रीबाई फुले हॉल, ठाकरे ग्राउंड शेजारी, महादेव मंदिरासमोर, यमुनानगर निगडी येथे संपन्न झाले.
सध्या आपल्या देशात व राज्यात कोरोना महामारी ने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असताना अनेक वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडत आहेत. त्याचप्रमाणे रक्त साठा ही कमी होत आहे. रक्ताची कमतरता अनेक रुग्णालयात तसेच वैद्यकीय संस्थेत होत आहेत. या पार्श्वभूमीवर हे रक्तदान शिबिर एक महत्त्वाचे सामाजिक उपक्रम ठरले. या रक्तदान शिबिरात अनेक नागरिकांनी आपले रक्तदान केले.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य श्री विठ्ठल जाधव, सामाजिक कार्यकर्ते आकाश चतुर्वेदी व धीरेंद्र सेंगर प्रमुख उपस्थित होते.
वि आर देअर सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष वृषाली प्रवीण व शांतिदूत परिवार निगडी चे अध्यक्ष व वि आर देअर सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष राहुल रांजणे यांनी सर्व रक्तदात्यांचे तसेच उपस्थितांचे आभार मानले.
तसेच यावेळी लॉकडाऊन काळात गरजू नागरिकांना पोटभर जेवण मिळावे या दृष्टिकोनातून शहरातील 100 गरजू नागरिकांना जेवण देण्यात आले.