शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
तक्षशिला मित्र संघ आणि भारतीय बौद्ध जन विकास समिती पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त आकुर्डी प्राधिकरणातील तक्षशिला बुद्ध विहार येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
Advertisement
या रक्तदान शिबिरात 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच, तक्षशिला मित्र संघाच्या वतीने निवासी श्रामनेर यांना त्यांच्या त्यांच्या विहारात जाऊन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या रक्तदान शिबिराला विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, अ प्रभागाच्या अध्यक्षा शर्मिला बाबर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, युवा उद्योजक राजेंद्र सोनवणे यांनी भेट दिली.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रताप सोनवणे, सुनील तायडे, शैलेंद्र बैसाणे, दत्तात्रय मिसाळ, एच. पी. रामटेके मिसाळ, सदाशिव कळसेकर, यशवंत भालेराव, अशोक तनपुरे यांनी पुढाकार घेतला.
Advertisement