शबनम न्यूज / मावळ
टाटा पॉवर कंपनीच्या वतीने मावळ तालुक्यातील गरजूंना रेशनिंग कीट व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किटचे वाटप आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले शासकीय विश्रामगृह वडगाव मावळ येथे करण्यात आले. याबद्दल टाटा कंपनीचे आमदार सुनील शेळके यांनी आभार मानले .
या वेळी आप;या प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार सुनील शेळके यांनी सांगितले कि टाटा उद्योग समूह हा नेहमीच मोठ्या संकटावेळी संपूर्ण देशाला मदत करण्यासाठी तत्पर असतो. संकट काळात मदतीसाठी नेहमीच पुढे असणाऱ्या टाटा समूहाने कोरोना विरोधातील लढाईत देखील झोकून देत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोरोनाचे संकट आल्यापासून मा.रतनजी टाटा यांनी विविध पद्धतीने लोकांपर्यंत आपला मदतीचा हात पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या औदार्यामुळे टाटा समूहाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात अपार आपुलकी आहे.